Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याप्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याची का सोडली साथ?

प्रशांत किशोर यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्याची का सोडली साथ?

दिल्ली | Delhi

प्रशांत किशोर (Prashant Kishor) आगामी काळात काँग्रेसमध्ये (Congress) महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याची चर्चा सुरू असून, काँग्रेसमध्ये फेरबदलाचे संकेत मिळत आहे. राजकीय वर्तुळात (Political News) काँग्रेसमधील बदलांची चर्चा सुरू असतानाच प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Punjab CM Amarinder Singh) यांची साथ सोडली आहे. प्रशांत किशोरांच्या (PK) अचानक घेतलेल्या निर्णयामुळे खळबळ माजली आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगाल विधानसभेचा (West Bengal Legislative Assembly) निकाल लागल्यापासून प्रशांत किशोर यांच्या नावाची केंद्रीय राजकारणात (central politics) जोरदार चर्चा सुरू आहे. प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मुख्य राजकीय सल्लागार (Political advisor) पदाचा राजीनामा दिला आहे. ऐन पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिल्यानं अमरिंदर सिंग यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे. (Prashant Kishor Resigns As Principal Advisor To Punjab Chief Minister Amarinder Singh)

प्रशांत किशोर यांनी पत्र लिहून आपल्या राजीनाम्यामागचं कारण सांगितलं आहे. पत्रात प्रशांत किशोर म्हणालेत, ‘मी सार्वसजिक जीवनातील सक्रिय भूमिकेतून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मी आपला प्रमुख सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळण्यास सक्षम नाही. मला माझ्या भविष्यातील कार्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की मला जबाबदारीतून मुक्त करण्याची कृपा करावी. या पदावर माझी निवड करण्यासाठी आणि मला संधी देण्यासाठी मी तुमचे आभार मानतो.’

दरम्यान, गेल्या काही दिवसांत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar), काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi), महासचिव प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. विशेषतः राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेली त्यांची बैठक चर्चेचा विषय ठरली. या बैठकीपासूनच प्रशांत किशोर काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोललं जाऊ लागलं. हे देखील लक्षणीय आहे की, प्रशांत किशोर यांचे हे पाऊल अलीकडच्या कल्पनेदरम्यान आले आहे की ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) मध्ये एका महत्त्वाच्या पदावर सामील होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या