Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजप्रशांत कोरटकरला न्यायालयाचा झटका; दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

प्रशांत कोरटकरला न्यायालयाचा झटका; दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली

कोल्हापूर | Kolhapur
कोल्हापुरातील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक केली आहे. प्रशांत कोरटकर याची तीन दिवासंची पोलिस कोठडी आज संपली आहे. त्याला आज पुन्हा कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आले. कोरटकरला न्यायालयाने झटका देत आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

तो मी नव्हेच म्हणत गेल्या महिनाभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. ही कोठडी आज (२८ मार्च) पूर्ण होत असल्याने आज कोरटकरला मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोर्टासमोर सादर केले. त्याच्याकडून अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. फरार काळात तो कुठे-कुठे गेला. मोबाईल डेटा त्याने नष्ट केला आहे. तो फॉरेन्सिक लॅबमधून परत मिळवण्यासाठी त्याची आवश्यकता आहे, त्यामुळे प्रशांत कोरटकरची पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली, त्यानंतर दोन दिवसांची कोठडी वाढवून दिली आहे.

- Advertisement -

वकील असीम सरोदे यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, प्रशांत कोरटकर खोटारडे आहेत, हे समोर आले आहे. त्याने पुरावे नष्ट केले आहेत, हे स्पष्ट होत आहे. एका सट्टा बुकीच्या तो संपर्कात आहे. त्याची माहिती समोर येणे सुद्धा आता गरजेचे आहे. कोरटकर ६ ते ७ ठिकाणी राहिला आहे. त्यामुळे त्या त्या वेळी त्याने वेगवेगळ्या गाड्या वापरल्या आहेत. त्यामुळे त्याचा तपास गरजेचा आहे त्यामुळे त्याला पोलीस कोठडीत ठेवणे गरजेचे आहे.

कोरटकर यांने ज्या गाडीतून प्रवास केला, त्या धीरज चौधरी याची गाडी जप्त करण्यात आली आहे. ज्या हॉटेलमध्ये राहिला त्या हॉटेल मालकांना तपासकामी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ५ ते ६ वेग वेगवेगळ्या ठिकाणी तो फिरला आहे. त्यावेळी वेगवेगळ्या गाड्या वापरल्या आहेत. पत्रकार आहे, असे सांगतो आणि केवळ जुजबी माहिती देतो. कोणत्या संघटना त्याला मदत करत असतील, तर त्यांचा काय उद्देश आहे?, त्याला आर्थिक मदत कोणी केली याची माहिती आम्ही घेत आहे, हे सुद्धा कोरटकरच्या चौकशीतून पुढे येणार आहे. कोरटकरला ज्यांनी मदत केली आणि जी नावे समोर आली आहेत. त्या लोकांचा मूळ काय उद्देश होता का? आणि आरोपींचा काय उद्देश होता का ? हे तपासणे गरजेचे आहे. त्या सर्वांसोबत कोरटकरची चौकशी होणे गरजेचे आहे, असा युक्तीवाद सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी यावेळी केला.

प्रशांत कोरटकर याने महापुरुषांचा अपमान करणारे वक्तव्य केले होते, त्यासोबतच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. त्याने फोन करुन धमकी दिली होती. तो फोन त्याच्या पत्नीने आधीच कोल्हापूर पोलिसांकडे जमा केला आहे. मात्र मोबाईल फोन पोलिसांत जमा करण्यापूर्वी त्यामधील संपूर्ण डेटा डिलिट करण्यात आला. तो परत मिळवण्यासाठी प्रशांत कोरटकरची मदत आवश्यक आहे, असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला. त्यामुळे त्याची कोठडी वाढवून मिळण्याची मागणी करण्यात आली, त्यानंतर कोर्टाने दोन दिवसांची कोठडी वाढवून दिली आहे.

य‍धीश एस एस तट यांच्या समोर सुनावणीला सुरुवात झाली असून सरकारी पक्षातर्फे वकील सूर्यकांत पोवार, इंद्रजीत सावंत यांच्या तर्फे अँड.असीम सरोदे हे ऑनलाइन पद्धतीने सुनावणीत सहभागी झाले आहेत. तर प्रशांत कोरटकर यांच्या तर्फे सौरभ घाग हे प्रत्यक्ष वकील म्हणून उपस्थित होते. अशातच, कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात ॲड. सौरभ घाग आणि ॲड. असीम सरोदे यांच्यात कोर्टासमोर तू-तू, मैं-मैं झाल्याचे बघायला मिळाले आहे. तर दोघांनी एकमेकांना शांत बसा, असा दम भरला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Immigration and Foreigners Bill 2025: भारत देश धर्मशाळा नाही! इथे अशांतता...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकोणीही वाटेल तेव्हा भारतात येऊन राहायला, हा देश धर्मशाळा नाही. व्यापार, शिक्षण व संशोधनासाठी येणाऱ्या लोकांचे स्वागत आहे. मात्र,...