Wednesday, February 4, 2026
HomeनगरRahuri : नदीपात्रात पाय घसरून पडल्याने इसमाचा मृत्यू

Rahuri : नदीपात्रात पाय घसरून पडल्याने इसमाचा मृत्यू

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील प्रवरा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय गोकुळ निकम रा. सात्रळ, ता. राहुरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. 24 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास दत्तात्रय निकम हे सात्रळ येथील प्रवरा नदीपात्रात असताना अचानक पाय घसरून पाण्यात पडले.

- Advertisement -

ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी प्रवरा हॉस्पिटल, लोणी येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत लोणी पोलीस स्टेशनकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 194 अन्वये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. सतिष आवारे हे करत आहेत.

YouTube video player

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...