उक्कलगाव |वार्ताहर|Ukkalgaon
श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील बेलापूर (Belapur) येथे प्रवरानदीपात्रात (Pravara River) एका अज्ञात व्यक्तीने पुलावरून उडी मारून आपली जीवनयात्रा (Suicide) संपवली. ही घटना शनिवार सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच बेलापूर खुर्दचे पोलीस पाटील युवराज जोशी व महसूल सेवक सुनील बाराहाते घटनास्थळी हजर झाले होते.
परंतु ही घटना वार्यासारखी बेलापूर व परिसरात पसरली. हा व्यक्ती उडी मारत असताना आजूबाजूला असलेल्या लोकांनी पाहिले असून, पुलावर उडी मारताना त्याने आपली चप्पल पुलावर ठेवून उडी मारून आपली जीवनयात्रा (Suicide) संपवली. हा व्यक्ती कोण आहे? कुठला आहे? याची माहिती अजून मिळाली नाही. सांयकाळी पाचपर्यंत सदर व्यक्तीचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता. पावसाच्या आगमनामुळे शोध मोहीमेमध्ये अडथळा निर्माण झाल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली.




