Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजडॉ. प्रवीण गेडाम नाशिकचे नवे विभागीय आयुक्त

डॉ. प्रवीण गेडाम नाशिकचे नवे विभागीय आयुक्त

नाशिक । Nashik

कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणून बदली झाली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागेवर कृषी विभागाचे आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती झाली आहे. अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी याबाबत आदेश काढला असून, डॉ. प्रवीण गेडाम यांनी तातडीने पदभार स्वीकारावा, असे म्हटले आहे.

- Advertisement -

डॉ. गेडाम हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. डॉ. प्रवीण गेडाम यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत नाशिक मनपा आयुक्तपदाचाही कार्यभार सांभाळलेला आहे. त्यामुळे नाशिक हे त्यांना चांगले परिचित आहे. शिवाय, त्यावेळी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे त्यांनी अतिशय काटेकोर नियोजन केले होते. त्यामुळे त्यादृष्टीने आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली असावी अशीही चर्चा आहे.

तसेच राज्यभरात गाजलेला जळगावचा घरकुल घोटाळा त्यांनी बाहेर काढला. याच प्रकरणी माजी आमदार सुरेश जैन आणि अन्य नेत्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तसेच, डॉ. गेडाम यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदासह विविध शहरांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या सर्वोत्तम कारभाराची दखल घेत मोदी सरकारने त्यांना केंद्रात बोलवून घेतले. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. तेथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांना राज्याचे कृषी आय़ुक्त आणि आता नाशिकचे विभागीय आयुक्त ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणावरून सुप्रिया सुळे आणि रोहित...

0
मुंबई | Mumbai राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर एका महिलेने (Woman) आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी सदर महिलेला...