Wednesday, May 8, 2024
Homeजळगावजिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणासह थंडीचे प्रमाणात देखील कमी अधिक प्रमाणात आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने रब्बी पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.

जिल्ह्यात गेल्या सप्ताहात दिवसाचे तापमानात 32 ते34 अंशपर्यंत वाढले होते, तर रात्रीच्या तापमान देखील 22 ते27 अंशा दरम्यान होते.

मात्र आर्द्रता अत्यंत कमी होती त्यामुळे वातावरण स्वच्छ होते.मात्र या सप्ताहात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे.

दिवसभर ढगाळ वातावरण आसह तापमान सुमारे 24 ते 22 अंश यादरम्यान तर 79% आर्द्रतेचे प्रमाण असून रात्रीच्या तापमानात देखील घट झाली असून 14 ते 19 अंश यादरम्यान तापमान असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे हवामान अभ्यासकांनी म्हटले आहे.

शनिवारी दि. 12 रोजी दिवसभर ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात बहुतांश तालुका परिसरात ग्रामीण भागात देखील तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती तर रात्रीच्या तापमानात देखील घट झाल्याने वातावरणातील बदलामुळे गारठ्यात वाढ झाली आहे.

आगामी दोन-तीन दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण सह तुरळक प्रमाणात 1 ते 5 मी.मी. पावसाची शक्यता असल्याचे वेलनेस फाऊंडेशनचे हवामान हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या