Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यांना गिफ्ट; देशवासीयांना शुभेच्छा

पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यांना गिफ्ट; देशवासीयांना शुभेच्छा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

नववर्ष सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे आणि उत्तम आरोग्याचे जावो. तसेच, आपण प्रगती आणि समृद्धीची नवीन उंची गाठत राहू आणि आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करूया, असे ट्विट नववर्षाच्या (New Year) पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी करून देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत…

- Advertisement -

यासोबत पंतप्रधानांनी त्यांच्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमातील एका भागाची क्लिपदेखील शेअर केली आहे. ज्यात त्यांनी देशाला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी मोठा विचार करा, मोठी स्वप्ने पाहा आणि स्वतःला समर्पित करा आणि २०२२ हे वर्ष नवीन भारत घडवण्यामध्ये सोनेरी पान बनवा असे आवाहन लोकांना केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना (Farmers) भेट दिली आहे. त्यांनी पीएम किसान सन्मान निधीच्या (pm kisan samman nidhi) दहाव्या हप्त्याची रक्कम जमा केली आहे. या माध्यमातून १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकारकडून (Central Government) प्रत्येकी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. यात दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो.

पीएम किसान पोर्टलनुसार या योजनेचा पहिला हप्ता १ डिसेंबरपासून ३१ मार्चदरम्यान पाठवला जातो. तर दुसरा हप्ता १ एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान शेतकन्यांच्या खात्यात पाठवले जातात. तर तिसरा हप्ता हा १ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या