Monday, May 6, 2024
Homeधुळेप्राचार्य नॉटरिचेबल, दालनास केले सील

प्राचार्य नॉटरिचेबल, दालनास केले सील

पिंपळनेर Pimpalner । वार्ताहर

पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी संचालित (Operated by Pimpalner Education Society), वरिष्ठ महाविद्यालयातील (Senior College) प्राचार्यांच्या दालनास (Principal’s Hall) संस्थाध्यक्ष व संचालकांनी (President and Director) सील (Seal) केले. तसेच प्राचार्यांना निलंबनाची नोटीस (Notice of Suspension) पाठविण्यात आली.

- Advertisement -

पिंपळनेर वरिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष रूपचंद शिंदे, उपाध्यक्ष सुरेंद्र मराठे, कॉलेज कमिटी चेअरमन धनराज जैन, संचालक एच. आर. गांगुर्डे, डॉ.विवेकानंद शिंदे, सुभाष जैन, ए.बी.मराठे, श्रीकांत मराठे तसेच प्राध्यापक व कर्मचारी यांनी प्राचार्य एस.टी.सोनवणे यांच्या कार्यालयाकडे जावून पाहिले असता कार्यालयाला कुलूप लावलेले दिसले.

प्राचार्य विद्यालयात आढळून आले नाहीत. त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता झाला नाही. त्यांच्या दालनात संस्थेचे महत्त्वपूर्ण कागदपत्र (रेकॉर्ड) असल्याने व प्राचार्य नसल्याने कार्यालयाला संस्थेचे अध्यक्ष रूपचंद शिंदे व त्यांच्या संचालक मंडळाने तसेच प्राध्यापक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत प्राचार्यांच्या कार्यालयाला सिल केले.

कालच प्राचार्यांना निलंबनाची नोटीस रजिस्टरने पाठवल्याचे संस्थाचालकांनी सांगितले. प्रभारी प्राचार्य म्हणून डॉ. पी.के.आहिरे यांची निवड केल्याचे संस्थाचालकांनी जाहीर केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या