Thursday, January 8, 2026
Homeमहाराष्ट्रपुण्यात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना! पाहा हेलिकॉप्टर कोसळतानाचा थरारक VIDEO

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना! पाहा हेलिकॉप्टर कोसळतानाचा थरारक VIDEO

पुणे । Pune

पुणे जिल्ह्यात खासगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. (Pune helicopter crash) दुर्घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेलं नाही. पुणे जिल्ह्यातील पौडनजीक कोढांवळे गावातीस गारवा हॅाटेलनजीक ही घटना घडली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचं हेलिकॉप्टरने मुंबईहून उड्डाण केलं होतं हे हेलिकॉप्टटर हैदराबादच्या दिशेने जात होत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील पौडनजीक आल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाली.

YouTube video player

हे हि वाचा : शिखर धवनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

यानंतर हेलिकॉप्टर थेट जमिनीवर कोसळलं. घोटावडेच्या दिशेनं येणारं हेलिकॉप्टर घटनास्थळी घिरट्या घालताना काही प्रत्यक्षदर्शींना दिसलं. त्यानंतर ते जमिनीवर कोसळलं.

हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. या हेलिकॉप्टरमधून चार लोक प्रवास करत होते. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना या दुर्घटनेची माहिती कळताच ते देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच शेजारच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं.

हे हि वाचा : “नराधमाला पाठिशी घालणारं विकृत सरकार…”; भर पावसात उद्धव ठाकरे संतापले

ताज्या बातम्या

Nashik Crime : पैशांवरून बालमित्रांत वैर; वसुलीसाठी थेट जाळपोळ

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बालपणापासूनची घट्ट मैत्री, वर्षानुवर्षांचा विश्वास आणि त्यातून झालेले कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार अखेर गंभीर वैरात बदलून थेट जाळपोळीपर्यंत पोहोचल्याची खळबळजनक घटना...