Friday, May 3, 2024
Homeनगरसलग चार दिवस बँका बंद

सलग चार दिवस बँका बंद

अहमदनगर (प्रतिनिधी) –

खासगीकरणाविरोधात कर्मचार्‍यांनी 15 आणि 16 मार्चला संपाची हाक दिली आहे. शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत.

- Advertisement -

सर्व सरकारी क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण करणार असल्याचे अर्थमंत्री सीतारामन यांनी नुकतेच जाहीर केले आहे. बँकांचे खाजगीकरण करण्यापेक्षा सरकारने बुडीत कर्ज वसुलीसाठी बँकांचे हात बळकट करावे ज्यामुळे बँका ह्या नफा कमावू शकतील.

बँकांच्या खासगीकरणाच्या या निर्णयांविरोधात बँक कर्मचारी व अधिकार्‍यांच्या संयुक्त संघटना युनाइटेड फोरम ऑफ बँक युनिअन्सने दि. 15 व 16 मार्च 2021 रोजी दोन दिवसांच्या संपाचे आवाहन केले आहे.

नगर शहरातील सर्व सार्वजनिक बँका, स्टेट बँकेच्या सर्व शाखा तसेच काही खाजगी बँकांतील कर्मचारी व अधिकारी या संपात सहभागी होणार असून या सर्व बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता सभा किंवा निदर्शने न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दि. 15 मार्च रोजी महात्मा गांधी रोड, तेलीखुंट, जुना कापड बाजार तसेच दि. 16 मार्च 2021 रोजी दिल्ली गेट आतील व बाहेरील रस्ता, चितळे रास्ता या ठिकाणी सर्व कर्मचारी-अधिकारी मागण्यांचे फलक हाती घेऊन रस्त्याच्या दुतर्फा सर्व नियमांचे व सुरक्षिततेचे पालन करीत शांततेत सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत निषेध करणार आहे.

भविष्यात उद्भवणार्‍या भयानक संकटाचा नाश करण्यासाठी ग्राहकांनी बँक कर्मचारी व अधिकार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा लढा तीव्र करण्यात साथ द्यावी, असे आवाहन युनाइटेड फोरम ऑफ बँक युनिअन्सच्या वतीने उल्हास देसाई यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या