Friday, May 3, 2024
Homeक्रीडा'प्रो कबड्डी'चा नववा हंगाम आजपासून

‘प्रो कबड्डी’चा नववा हंगाम आजपासून

मुंबई | Mumbai

बंगळूरूमध्ये प्रो कबड्डीच्या (Pro Kabaddi) नववा हंगाम आजपासून सुरु होणार आहे. सलामीचा सामना यु मुंबा आणि दबंग दिल्ली संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे…

- Advertisement -

यंदा नवीन नियमांसह ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. रेडरसाठी सेल्फ आउटचा नियम लागू करण्यात आला आहे. यंदाच्या सत्रातील सर्व सामन्यांचे आयोजन ३ शहरांमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये बंगळूर, हैद्राबाद आणि पुणे शहराचा समावेश आहे. यंदाच्या हंगामात एकाच दिवशी ३ सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे.

सलामी लढतीनंतर बंगळूर बुल्स आणि तेलगू टायटन्स संघांमध्ये सामना खेळवण्यात येईल. त्यानंतर जयपूर पिंक पँथर्स आणि युपी योद्धा यांच्यात सामना रंगणार आहे. यंदाच्या सत्रातील लीगसाठी महराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये पंचांसाठी खास प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये यादरम्यान पंचांना विविध नियमांची माहिती देण्यात आली आहे.

यामध्ये ७० पेक्षा अधिक पंचांनी सहभाग घेतला होता यंदाच्या नवव्या हंगामात पंचांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला ही संख्या ३८ होती. रेडरसाठी नवीन नियम सेल्फ आउटचा नियम लागू करण्यात येणार आहे.

जज लॉबीच्या बाहेर गेला किंवा रेषेला स्पर्श केल्यास रेडरला बाद ठरवण्यात येणार आहे. यादरम्यान संघातील डिफेंडर बाद राहणार नाहीत त्यांना हा नियम लागू नसेल. सर्व सामन्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येणार आहे.

सलिल परांजपे,नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या