Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशलहान मुलांसाठी पारदर्शक मास्कची निर्मिती

लहान मुलांसाठी पारदर्शक मास्कची निर्मिती

नवी दिल्ली – करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर लहान मुलांसाठी पारदर्शक मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. या मास्कद्वारे मुले सुरक्षित राहू शकतील, असा दावा केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संघटनेने (सीएसआयओ) केला आहे. Central Scientific Instruments Organisation(CSIO) तिसरी लाट येण्यापूर्वीच हा मास्क देशभरातील मुलांना मिळावा यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. या मास्कची किंमत 200 ते 300 रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे मास्क जूनच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता आहे. यासाठी सीएसआयओने उत्तर प्रदेशच्या एका मोठ्या कंपनीसोबत करार केला आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील करोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची ठरु शकते असे सांगितले जात आहे. काही संस्थांनी या लाटेत मुलांना धोका नसल्याचे म्हटले आहे तसेच पालकांनी सावधगिरी बाळगल्यास तिसरी लाट परतवून लावण्याचा विश्‍वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

अशातच आता केंद्रीय वैज्ञानिक उपकरण संघटनेने पारदर्शक मास्कची निर्मिती केली आहे. यासंबंधीची चाचणी दिव्यांगांच्या (जे इशार्‍यावर संभाषण करतात) शाळांतील मुलांवर घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाली आहे.

पारदर्शक मास्कची वैशिष्ट्ये

– मुखाच्छादनामुळे चेहरा स्पष्ट दिसेल

– विमानतळ, रेल्वेस्थानकात ओळख पटू शकेल

– धाप लागत नसून फॉगिंगही होत नाही

– विषाणू आत शिरणे अशक्य

– 20 ते 25 वेळा आरामात वापरता येणार

– साबणाने धुता येणे शक्य असून, सॅनिटायझरने (निर्जंतुकीकरण द्राव) साफ करता येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या