Thursday, March 13, 2025
Homeनाशिकघोडागाडी शर्यतीला प्रतिबंध

घोडागाडी शर्यतीला प्रतिबंध

नाशिक | Nashik

पिंपळखुटे, येवला नाशिक येथे होणाऱ्या बेकायदेशीर घोडागाडी शर्यती बाबत माहिती मिळताच पेटा इंडिया यांनी स्थानिक कार्यकर्ते अनिल कटारिया यांच्या सहकार्याने मालेगावच्या पोलिसांना सूचित करत समन्वय साधून घोडागाडी शर्यतीला प्रतिबंध घालण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत सुनयना बसू आणि पेटा इंडियाच्या कुएल्टी रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर यांनी अधिक सांगितले, प्राण्यांना घोडा आणि घोडागाडी शर्यतींमुळे अत्यंत शारिरीक ताण सहन करावा लागतो ज्यामुळे बऱ्याचदा त्यांना इजा होते, ते थकून जातात आणि मरण सुध्दा पावतात आणि म्हणून घोडा आणि घोडागाडी शर्यती क्रूर असतात. या प्राण्यांचे जीवन आधीच कठीण आहे, त्यात त्यांना मारहाण करुन जबरदस्तीने शर्यतीला भाग पाडणे हा आणखी एक अत्याचार आहे.

मालेगाव पोलिसचे अनिकेत भारती आय पी एस , अतिरिक्त पोलिस अधीक्षक, मालेगाव बाजीराव महाजन, उपविभागीय पोलिस अधिकारी, मनमाड आणि संदीप मंडलिक, पोलीस निरीक्षक, येवला तालुका पोलीस ठाणे यांचे आभार मानल्याचे बसू यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...