Saturday, November 2, 2024
Homeमुख्य बातम्यासिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भूखंड अधिग्रहणाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भूखंड अधिग्रहणाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) तयारीसाठी मनपा अ‍ॅक्शन मोडवर आली असून, तपोवातील (tapovan) साधूग्रामसाठी सुमारे 375 एकर भूखंड अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे (state government) पाठवला आहे.

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळ्यात मोठ्या साधूग्राम परिसरात सध्या मनपाच्या ताब्यात 75 एकर जागा आहे. त्यातील 50 ते 55 एकर जागेमध्ये वृक्षारोपण (tree plantation) करण्यात आले आहे सिटीलींक डेपो (Citylink Depot) ही या जागेत उभारण्यात आला आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सुमारे 350 एकर जागा अधिग्रहीत करावी लागणार आहे. या अधिग्रहणासाठी लागणार्‍या 4 हजार कोटी रुपयांच्या निधीचा (fund) प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे.

या 375 एकर भूखंडाचा वापर सिंहस्थात साधूग्रामसाठी (Sadhugram) होणार असून उर्वरित सुमारे 1 महिने याठिकाणी व्यवसायीक वापर करण्याचे नियोजन करता येणार आहे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात व्यवसायीक घडामोडी घडत असल्याने त्यांच्या साठी या जागेचा वापर करणे शक्य होणार आहे. मुंबईच्या बिकेसी धर्तीवर याठिकाणी भव्य शेडच्या माध्यमातून प्रदर्शन केंद्र उभारता येणार आहे.

रामायण सर्किटचा (Ramayana Circuit) भाग म्हणून याठिकाणी पर्यटनाला प्रोत्साहन देणार्‍या विविध उपाय योजना करणे शक्य होणार आहेत. नाशिकला पिल्मसिटी (Film City) निर्मीती करण्यच्या भाग म्हणून उर्वरित 11 वर्षासाठी याठिकाणी विविध चित्रपटाच्या चित्रीकरणाला लागणारे वातावरण निर्मीती करता येणार असल्याने शासनाच्या निधीची प्रतिक्षा केली जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या