Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमNewasa : खडकाफाटा येथील कुंटणखान्यावर छापा

Newasa : खडकाफाटा येथील कुंटणखान्यावर छापा

साई लॉजिंगच्या मालकासह मॅनेजरवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील खडकाफाटा येथल एका लॉजवर श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाने छापा टाकला.याठिकाणी स्वतःच्या फायद्याकरीता लॉज मालक व मॅनेजर हे या लॉजमध्ये कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांची सुटका केली असून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, 29 ऑक्टोबर रोजी अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांना खडका फाटा येथील लॉजवर कुंटणखाना सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या कार्यालयातील पो.हे. काँ. दादासाहेब लोंढे, पो.ना. संदीप दरंदले, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो. कॉ. सहदेव चव्हाण यांचे पथक खडका फाटा येथे कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने सायंकाळच्या सुमारास खडका फाट्यावर असलेल्या साई लॉजिंगमध्ये पोलीस पथकाने छापा टाकला.

YouTube video player

तिथे लॉज मालक बाळासाहेब भानुदास जाधव (वय 25) रा. मक्तापूर ता. नेवासा व लॉजचा मॅनेजर विकास योगेश ऊर्फ यहुबा औताडे (वय 25) रा. मुकिंदपूर ता. नेवासा हे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता महिलांना पुरूष ग्राहकांबरोबर शरीरसंबंध करण्याकरीता रुम उपलब्ध करुन देवून कुंटनखाना चालवून त्यावर आपली उपजिवीका करताना मुद्देमालासह मिळून आले. यावेळी तीन महिलांची सुटका करण्यात आली.

याबाबत श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोलीस नाईक संदीप संजय दरंदले यांच्या फिर्यादीवरुन लॉज मालक बाळासाहेब भानुदास जाधव व मॅनेजर विकास योगेश ऊर्फ यहुबा औताडे यांचे विरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 143 सह स्त्रीया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...