दिंडोरी | प्रतिनिधी Dindori
दिंडोरी-जोपूळ -पिंपळगाव रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन न करता काम सुरू केल्याच्या विरोधात, शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला मिळावा या मागणीसाठी शेतकरी कृती समितीने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश तिडके व तालुका अध्यक्ष श्याम मुरकुटे यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली.
रस्त्यासाठी अद्याप भूसंपादन झालेले नसतानाही काम सुरू असल्याबाबत शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती रस्ता रुंदीकरण झाल्यास रस्त्याच्या बाजूला शेतकऱ्यांची घरे विहीर बोर अशी महत्त्वाची साधने असून यात काही शेतकरी अल्पभूधारक आहे त्यांना मोबदला मिळाला पाहिजेत अन्यथा या शेतकरी वाऱ्यावर राहतील व भूमिहीन होतील या मागणीची मंत्री महोदय यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित विषय जिल्हाधिकारी यांच्याकडून समजून घेतला नक्कीच याविषयी आपण मार्ग काढू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले आहेत.
या कामाविषयी पुढील आठवड्यात महसूल मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीत मुंबईला मंत्रालयात बैठक ठेवण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले तसेच बैठक पूर्ण होईपर्यंत व या विषयात तोडगांगेपर्यंत काम बंद ठेवण्याचे निर्देश मंत्री महाजन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांना दिले.
या भेटी प्रसंगी भाजपा जिल्हाउपाध्यक्ष योगेश तिडके तालुका अध्यक्ष शाम मुरकुटे शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष शिवाजी डांगले उपाध्यक्ष माधव उगले अंकुश राहणे रोशन उगले दीपक महाले रुपेश उगले योगेश गायकवाड रामनाथ गायकवाड राजेंद्र फुगट एकनाथ उगले महेंद्र पगार सागर गुंजाळ नवनाथ लोखंडे संतोष लोखंडे व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.




