Friday, May 3, 2024
Homeनाशिककेंद्र सरकारच्या निषेधार्थ मालेगावी काँग्रेसची निदर्शने

केंद्र सरकारच्या निषेधार्थ मालेगावी काँग्रेसची निदर्शने

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

गतवर्षी मंजूर केलेले तीन कृषि विषयक कायदे (Agricultural laws) रद्द केले जात नसल्याचे तसेच इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या (Fuel and essentials) वाढलेल्या किंमती कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना केंद्र सरकारतर्फे केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ आज तालुका काँग्रेसतर्फे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

- Advertisement -

काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे (Congress District President Dr. Tushar Shewale) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सहभागी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा (Protest announcement by the central government) देत परिसर दणाणून सोडला आहे. दरम्यान, अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत सत्ता हस्तगत करणार्‍या मोदी सरकारने (Modi Government) गोरगरीब जनतेची फसवणूक करत त्यांना महागाईच्या वणव्यात ढकलले आहे.

भांडवलदार कंपन्यांचे हिताचे तीन कृषि कायदे (Three agricultural laws) मंजूर करत शेतकर्‍यांवर देखील अन्याय केला असल्याने आजच्या भारत बंदला समर्थन देण्यासाठी काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात येत आहे. कृषि कायदे रद्द न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी यावेळी बोलतांना दिला.

तीन कृषिविषयक कायद्यांना एक वर्षे पुर्ण होत आहे. वर्षभरापासून कायदे रद्द होण्यासाठी शेतकरी रस्त्यावर आंदोलन करीत आहे. मात्र त्याची दखल केंद्र सरकारने घेतली नसल्याच्या निषेधार्थ किसान मोर्चातर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला मालेगाव शहर, तालुक्यात प्रतिसाद मिळाला नाही. मात्र काँग्रेसतर्फे भारत बंदच्या (Bharat Band) समर्थनार्थ तसेच वाढत्या महागाईच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. शेवाळे यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले. इंधन दरवाढीमुळे (Fuel price hike) महागाई गगनाला भिडली असल्याने सर्वसामान्य जनता अक्षरश: हताश झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढ त्वरीत मागे घेण्यात यावी, अशी मागणी शेवाळे यांनी केली. या आंदोलनात तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, दत्तात्रेय खैरनार, नितीन बच्छाव, संजय पाटील, वाय.के. खैरनार, मधुकर सावंत, शेख रज्जाक, पोपटराव बोरसे, डॉ. अरूण पठाडे, नामदेव पवार, डॉ. ज्ञानेश्वर भामरे, सुकदेव देवरे, साहेबराव देवरे, डॉ. शिरोळे, भगवान शेवाळे, गणेश देवरे, रामकृष्ण पवार, नामदेव पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या