Friday, September 20, 2024
Homeनाशिकमनोरुग्ण थेट रेल्वेच्या डब्यावर चढला अन्...;

मनोरुग्ण थेट रेल्वेच्या डब्यावर चढला अन्…;

नांदगाव स्टेशनवर मोठा गोंधळ

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

- Advertisement -

बुधवारी पहाटेच्या सुमारास कुशीनगर व महानगरी एक्स्प्रेस नांदगाव रेल्वे स्थानकावर (Nandgaon Railway Station) आली असता एक वेडसर इसम डब्यावर चढला. 

अतिउच्च दाबाच्या ओव्हर हेड तारांजवळ फिरत असतांना त्याला उतरवण्याच्या प्रयत्नात रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांना अर्धा तास वेळ लागल्याने दोन्ही रेल्वे गाड्यांना अर्धातास खोळंबा झाला. स्टेशन परिसरामध्ये एकच गर्दी झाली होती.

पहाटे 5:40 सुमारास कुशीनगर व महानगरी एक्स्प्रेस रेल्वे (Mahanagari Express Railway) स्थानकावर आल्या असता कुशीनगर एक्सप्रेसच्या डब्यावर एक वेडसर इसम चढला. 

ओव्हर हेड वायर जवळून फिरु लागला रेल्वे स्थानकावर असलेल्या नागरिकांना आढळून आला असता तात्काळ कर्तव्यावर असलेले डि.के.तिवारी व समाधान पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ओव्हर हेड वायर बंद केली व या व्यक्तीला रेल्वे पोलीस (Railway Police)व रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने खाली उतवरण्यात यश आले. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी गाडी मात्र अर्धा तास खोळंबली.

- Advertisment -

ताज्या बातम्या