Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedसमृद्ध करणारा अनुभव

समृद्ध करणारा अनुभव

परिसंवाद-‘दिग्गज’साकारताना

सागर देशमुख, अभिनेता

- Advertisement -

पु. ल. देशपांडे ऊर्फ भाई हे तमाम मराठीजनांचे आवडते व्यक्तिमत्व आहेत; तर डॉ.आंबेडकर हे जगप्रसिद्ध, महान व्यक्ती. दोन्ही व्यक्तींचा जीवनप्रवास, कार्य यामध्ये महद्अंतर आहे; तसेच हावभाव, देहबोलीही प्रचंड वेगळी आहे. अशा दोन्ही धाटणीच्या भूमिका करणे हे माझ्यासाठी आव्हानात्मकच होते. त्यातही डॉ. आंबेडकर साकारण्याचे आव्हान अधिक मोठे होते. पण हे आव्हान पेलायचे ठरवले. या भूमिकेच्या निमित्तानं मी अभिनेता म्हणून श्रीमंत झालो. प्रत्येक भूमिकेसाठी कलाकार मेहनत घेत असतात. पण अनेकदा त्या भूमिकेकडूनही कलाकाराला भरपूर काही मिळतं. या चरित्र भूमिकांनी मला समृद्ध केलं.

भालबा केळकर, डॉ.श्रीराम लागू आदी मान्यवरांनी स्थापन केलेल्या ‘प्रोग्रेसिव्ह डायनामिक असोसिएशन’ या नाट्यसंस्थेत मी 22 दिवसांची नाट्यकार्यशाळा केली होती. तिथेच नाटकाची गोडी लागली. त्यानंतर सातत्याने प्रायोगिक नाटकं करत राहिलो. माझे वडील वकील होते, त्यामुळे त्यांची इच्छा म्हणून मी वकील झालो. पण माझा ओढा नेहमीच नाटकांकडे होता. वकिलीची परीक्षा पास झाल्यावर मुंबईत येऊ न चार व्यावसायिक नाटकांमध्येही काम केलं. पण व्यावसायिक नाटकातलं काम मला तितकंसं मानवलं नाही. त्यामुळं पुन्हा पुण्यात येऊ न वकिली सुरू केली. 6 ते 7 वर्षमी न्यायालयात जाऊ न वकिलीचा सराव (प्रॅक्टिस) केला. त्यानंतर ते सोडून लिखाण आणि अभिनयाकडे वळलो. हिंदी, मराठी आणि इंग्रजी प्रायोगिक नाटके केली. पुढे जाहिराती आणि चित्रपट असा प्रवास झाला. माझं ‘पिया बहरुपिया’ नावाचं हिंदी नाटक मी करायला घेतलं. त्याचा पहिला प्रयोग लंडनच्या शेक्सपिअर्स ग्लोब थिएटरमध्ये झाला. शेक्सपिअर यांनी स्वत: ज्या ठिकाणी काम केलं अशी ती वास्तू आहे. तिथे प्रयोग झाला त्याक्षणी वाटलं की अभिनयामुळेच आपण इथं येऊ शकलो. पूर्वजन्माची पुण्याई म्हणून हा अनुभव घेता आला. हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता.

अशाच प्रकारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे या दोन दिग्गजांच्या व्यक्तीरेखा साकारण्याची संधी मला मिळाली, याबाबतही मी स्वतःला भाग्यवान समजतो. पुलंची भूमिका साकारायला मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते. महेश मांजरेकर या भूमिकेसाठी अतुल परचुरे, आनंद इंगळे किंवा निखील रत्नपारखी यांच्यापैकी एखाद्याची निवड करतील, असे मला वाटत होते. अतुल परचुरे आणि पु लंच्या चेहर्‍यात तर कमालीचे साम्य आहे. त्यामुळे मला ही भूमिका मिळणं हा सुखद धक्काच होता. महेश माजरेकरांचा फोन आला आणि मला त्यांनी या भूमिकेसाठी विचारले. मी लगेच ही भूमिका स्वीकारली.

या भूमिकेमुळे मला पुलंना एक व्यक्ती म्हणून जाणून घेण्याची संधी मिळाली. भाई हे तमाम मराठीजनांचे आवडते व्यक्तिमत्व आहेत; तर डॉ. आंबेडकर हे जगप्रसिद्ध, महान व्यक्ती. दोन्ही व्यक्तींचा जीवनप्रवास, कार्य यामध्ये महद्अंतर आहे; तसेच हावभाव, देहबोलीही प्रचंड वेगळी आहे. अशा दोन्ही धाटणीच्या भूमिका करणे हे माझ्यासाठी आव्हानात्मकच होते. त्यातही डॉ. आंबेडकर साकारण्याचे आव्हान अधिक मोठे होते. पण हे आव्हान पेलायचे ठरवले. या भूमिकेच्या निमित्तानं मी अभिनेता म्हणून श्रीमंत झालो. स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी या भूमिकेसाठी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी महत्त्वाचा होता. मी स्वतः पुण्याच्या विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. भारतीय संविधानाचा तेव्हा केलेला अभ्यास ही भूमिका साकारताना कामी आला. ‘द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया’ असा एक पेपर कायदा शिकणार्‍या विद्यार्थ्यांना द्यावा लागतो. भारताची राज्यघटना लिहिणं किती कठीण आहे हे पेपर लिहिताना नेहमी वाटायचं. परंतु राज्यघटनेचे शिल्पकार असणार्‍या महानायकाची भूमिका साकारायला मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझा भूमिकेचा प्रवास हा वैयक्तिक असतो. चरित्र भूमिका साकारताना त्या व्यक्तीविषयीच्या साहित्याचं वाचन करणं, त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेणं, हे मला स्वत:ला कुठेतरी माणूस म्हणून श्रीमंत करतं. माझ्यातील अभिनेत्याच्या वाढीसाठीही ते फायदेशीर ठरतं.

डॉ.आंबेडकरांनी देशासाठी केलेले कार्य अत्युच्च पातळीचे आहे. राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक अशा सर्वच स्तरांवर बाबासाहेबांचे विचार आणि कर्तृत्व खूप व्यापक आहे. त्यांचे विचार समजून घेण्याची प्रक्रिया माझ्या अंतापर्यंत सुरूच राहील असे मला वाटते. त्यामुळे या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा मला प्रचंड आनंद झाला होता. परंतु नंतरचे दोन दिवस मी झोपलो नव्हतो. कारण एवढे मोठे जबाबदारीचे काम आपल्याकडून होईल का? या व्यक्तिरेखेला आपण न्याय देऊ शकू का? याचे दडपण मनावर होते. कलाकार म्हणून मी आव्हाने स्वीकारणारा माणूस आहे. पण हे आव्हान खूप वक्गळे आणि मोठे होते. त्यापूर्वी मी वाहिन्यांवर भूमिका केलेल्या नव्हत्या. त्यामुळे या माध्यमाशीही मी अपरिचित होतो. अभिनय हा अभिनयच असला तरी माध्यम बदलते तेव्हा अनेक गोष्टींमध्ये बदल होतात. त्यामुळे या नव्या क्षेत्रात स्वतःला आजमावून पाहण्याची संधी मिळाल्याचाही आनंद होता.

प्रत्येक भूमिकेसाठी कलाकार मेहनत घेत असतात. पणअनेकदा त्या भूमिकेकडूनही कलाकाराला भरपूर काही मिळतं. कुठल्याही अभिनेत्याला लार्जर दॅन लाईफ व्यक्तींच्या व्यक्तीरेखा साकारताना खूप अभ्यास करावा लागतो. त्याप्रमाणे मीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला. यामध्ये त्यांनी लिहिलेले साहित्य वाचतानाच त्यांच्यावर लिहिले गेलेले साहित्यही वाचून काढले. जातीविषमता निर्मुलनाबाबत बाबासाहेबांनी केलेले काम हे खूप मोठे आहे. अपपळहळश्ररींळेप ेष उरीींश नावाचं जातीव्यवस्थेचं उच्चाटन यावर बाबासाहेबांनीच लिहिलेलं पुस्तक वाचलं. धनंजय कीर यांनी त्यांचे चरित्र लिहिलेले आहे. चांगदेव खैरमोडे यांनी त्यांच्यावर चरित्र लिहिलेले आहे. त्यावरच आमची मालिका आधारित होती. या सगळ्या पुस्तकांचे वाचन करणे आणि त्यातील आशय समजून घेणे अशा अनेक अंगांनी मी बाबासाहेबांचे विचार अभ्यासले. सुखदेव थोरात यांनी बाबासाहेबांवर दिलेली व्याख्यानं पाहिली. बाबासाहेबांच्या कार्याचा देशावर तसेच राजकीय, सांस्कृतिक दृष्ट्या झालेला परिणाम, आरक्षण म्हणजे काय? डॉ. आंबेडकर यांनी घटना लिहिली म्हणजे काय केलं? हे सगळं समजून घेत गेलो. सेटवरही फावल्या वेळात मी या पुस्तकांचं वाचन करायचो. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर एक पुस्तक प्रकाशित केलेले आहे. त्यात फक्त बाबासाहेबांचे फोटो आहेत. ‘चित्रमय स्वागत’ असे त्या पुस्तकाचे नाव आहे. यामध्ये डॉ. आंबेडकरांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, त्यांच्या बालपणापासूनचे सगळे फोटो आहेत. बायोपिक करताना त्या व्यक्तीच्या आयुष्यातील ऐतिहासिक घटना, वैयक्तीक आयुष्यातील प्रसंग या सर्व गोष्टी पाहणे महत्त्वाचे असते. विशेष म्हणजे, भरपूर साहित्य वाचूनही मला बाबासाहेब पूर्णत्वाने समजले आहेत, असे मी मानत नाही. कारण तो विचारांचा महासागर होता. बाबासाहेबांवर पीएचडी करणारे अनेक लोक आहेत. त्यांच्यावर आज खूप मोठा अभ्यास जगामध्ये सुरू आहे. त्यांच्या तुलनेने मी एक अभिनेता आहे. एक माध्यम आहे त्यांचे विचार सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठीचा.

ही भूमिका करत असताना मला आजिबात भिती वाटत नाही. याचे कारण आपण ज्या टीमबरोबर काम करत असतो ती टीम काय आहे हे मला माहिती होते. हे सगळे लोक खूप संशोधन करून हे चांगल्या पद्धतीने लोकांसमोर कसे आणता येईल याचाच विचार करत होते. पुणे विद्यापिठातील हरी नरके, चिन्मय केळकर, शिल्पा कांबळे यांसारखे मोठी आणि चांगले माणसांनी या मालिकेसाठी संशोधन केले. या मालिकेत शिवानीने माईची भूमिका केली. दोघेही पुण्याचेच असल्यामुळे आम्ही अनेक वर्षे एकमेकांना ओळखत होतो. तीही थिएटरच्या बॅग्राऊंडमधून आलेली आहे आणि मीही बर्‍यापैकी थिएटर करायचो. अभिनेत्री म्हणून ती अतिशय उत्तम आहे. त्यामुळे तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय चांगला होता. निनाद वैद्य आणि नितिन वैद्य हे आमच्या मालिकेचे निर्माते होते. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पहिले दोन भाग बघताना तर मोठे मोठे स्क्रीन लावले होते. लोकांनी एकत्रित बसून बघितले. हा प्रतिसाद माझ्यासाठी विलक्षण होता. एखाद्या नव्या मालिकेचे अशा प्रकारे स्वागत होणे ही बाब दुर्मिळच होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या