Friday, May 3, 2024
HomeUncategorizedसेंट्रल बँक ऑफ इंडियाची तिरंगा यात्रा

सेंट्रल बँक ऑफ इंडियाची तिरंगा यात्रा

औरंगाबाद – aurangabad

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Amrit Mahotsav) सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India), क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ‘हर घर तिरंगा’च्या प्रचारार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली. या रॅलीत बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

- Advertisement -

शिरसाटांच्या एका ट्विटने राज्यभर गोंधळ!

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने चिकलठाणा शाखा ते बजरंग चौकमार्गे सेक्टर ९ सिडको शाखेपर्यंत तिरंगा यात्रा सुरू काढण्यात आली. वंदे मातरम, भारत माता की जयच्या जयघोषात निघालेल्या या रॅलीला सर्वसामान्यांनी देखील भरभरून दाद दिली.

यावेळी प्रणव के. आर. झा, श्याम के. शिराढोणकर, धर्मेंद्र कुमार, केतन गायकवाड, स्वप्नील घुटके, तुषार, आशिष मून, भाग्यश्री, प्रतिमा बारोटे, पूजा झांबरे आदींची उपस्थिती होती. प्रादेशिक कार्यालयातील आणि स्थानिक शाखांमधील कर्मचाऱ्यांनी या तिरंगा यात्रेचे नेतृत्व केले. समन्वयक बैजनाथ प्रसाद यांनी सर्वांचे आभार मानले.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही वर्ष १९८० पर्यंत व्यवसायात प्रथम स्थान असलेली स्वदेशी बँक होती. तेच गतवैभव परत मिळवण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचा संकल्प करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या