पुणे | Pune
येथील नवले पुलावर (Navale Bridge) अपघाताची मालिका सुरूच आहे. रविवारी रात्री नवले पुलावर भीषण अपघात झाला असून तब्बल ४८ गाड्यांचे नुकसान (Accident) झाल्याची माहिती मिळत आहे. सुमारे 40 ते 50 जण या अपघातात जखमी झाल्याचे समजते…
- Advertisement -
याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाला. त्यानंतर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. कंटेनर अनेक गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ आदळला. त्यामुळे संपुर्ण रस्त्यावर ऑईल पसरले.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. नवले पुलावरील या भीषण अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.