Friday, July 12, 2024
Homeमहाराष्ट्रपुन्हा एकदा तयार करण्यात आले पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट

पुन्हा एकदा तयार करण्यात आले पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बनावट फेसबुक अकाउंट

पुणे | प्रतिनिधी

- Advertisement -

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांचे आणखी एक बनावट फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यात सहाव्यांदा हा प्रकार घडला आहे. सायबर ठगांनी राजेश देशमुख यांचे फोटो वापरत तसेच आयएएस असे लिहीत बनावट फेसबुक अकाउंट तयार केले आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असलेल्या डॉक्टर राजेश देशमुख यांच्याबाबत दोन महिन्यांत सहाव्यांदा हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी त्यांनी अनेकदा सायबर पोलिसात तक्रार सुद्धा केली आहे. परंतु अजूनपर्यंत एकावरही कारवाई झाली नाही.

Video : …अन् बिबट्याला लोकांनी खायला दिल्या चक्क ‘चपात्या’; प्रकरण पोहोचलं पोलिस ठाण्यात, नेमकं काय घडलं?

दोन महिन्यात पाच ते सहा वेळा डॉक्टर राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट खाते तयार करून सायबर चोरटे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहेत. त्यांनी यासंदर्भात सायबर सेलकडे तक्रारसुद्धा दिली आहे. तसेच कुठल्याही बनावट अकाउंटला बळी पडू नका, असे आवाहन केले आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. डिजिटलच्या या युगात ठगसुद्धा डिजिटल झाले आहेत. सायबर ठग सर्वसामान्य लोकांना फसवण्यासाठी विविध प्रकार करत असतात. मग यासंदर्भात राज्यात सायबर पोलिसांकडे रोज तक्रारी येतात. या तक्रारींची संख्या शेकडोमध्ये आहे. या फसवणूक प्रकरणात उच्च शिक्षित लोकही आहेत अन् उच्चपदस्थ अधिकारी आहेत. आता पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना सायबर ठगांचा फटका बसला आहे. दोन महिन्यात तब्बल सहा वेळा त्यांना सायबर ठगांनी फटका दिला आहे.

लळा असा लावावा की…! लाडक्या गुरूजींच्या बदलीने विद्यार्थीच नव्हे तर अख्खं गाव रडलं, भावूक करणारा VIDEO

- Advertisment -

ताज्या बातम्या