Tuesday, March 25, 2025
Homeक्राईमPune Crime News : "गुन्हा घडला तेव्हा..."; स्वारगेट अत्याचार प्रकरणी गृह राज्यमंत्री...

Pune Crime News : “गुन्हा घडला तेव्हा…”; स्वारगेट अत्याचार प्रकरणी गृह राज्यमंत्री योगेश कदमांची महत्त्वाची माहिती

पुणे | Pune

येथील स्वारगेट एसटी बस स्थानकातील (Swargate Bus Stand) शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार (Rape) झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी (Pune Police) १ लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. या संदर्भात आता गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

- Advertisement -

यावेळी मंत्री योगेश कदम म्हणाले की, “या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. एसटी महामंडळाच्या (ST Corporation) वतीने खासगी सुरक्षा रक्षक नेमले जातात. पोलिसांकडून नियमितपणे गस्त घालण्यात येते. घटनेच्या दिवशीदेखील गस्त घालण्यात आली होती. पोलिसांनी गस्त घातली, कुठलंही दुर्लक्ष पोलिसांनी केले नसल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी सावध होऊ नये यासाठी पोलिसांकडून या प्रकरणी गुप्तता पाळण्यात आली. ती पाळणं आवश्यक असून आरोपी लवकरच पकडला जाईल”, असे त्यांनी म्हटले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की,” पुणे शहरात (Pune City) जी घटना घडली आहे ती बस स्टँडच्या आवारात घडली आहे. पोलिसांनी रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत गस्त कितीवेळा घातली गेली याचीही माहिती मी घेतली आहे. पीआयही रात्री दीड वाजता गेले होते, त्यानंतर टीमसह तीन वाजताही तिथे होते. पोलीस अलर्ट नव्हते असा विषय नव्हता. आरोपीवर भुरट्या चोरीचे गुन्हे दाखल आहे. मात्र ते ग्रामीण भागातल्या पोलीस ठाण्यात आहे. पुणे शहरात जे आरोपी आहेत त्यांच्याकडे पोलीस लक्ष ठेवून असतात. त्यांचं रेकॉर्ड पोलिसांकडे असतं. जे ग्रामीण भागातून येतात त्यांचा रेकॉर्ड नसतो. पुणे शहरात सीसीटीव्ही आणखी मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ४३७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. आपण त्या दृष्टीनेही काम करतो आहे”, असेही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...