पुणे | Pune
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे (Rajendra Hagwane) यांची लहान सुन वैष्णवी यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. या घटनेनंतर तिचा पती आणि राजेंद्र हगवणे दोघेही फरार आहेत. तर वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केला, असा आरोप सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर (Pune Crime) वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे. या घटनेनंतर पिंपरी चिंचवडमधील कस्पटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, वैष्णवीच्या वडिलांनी सगळी हृदयद्रावक कहाणी माध्यमांसमोर कथन केली आहे.
वैष्णवीच्या (Vaishnavi) वडिलांनी (Father) सांगितले की, “वैष्णवीला लग्न झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यांतच सासरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. तिला कधी सुखाचे दिवस बघायला मिळालेच नाहीत. वैष्णवीच्या लग्नात साडेसात किलो वजनाची चांदीची ताटं दिली. ५१ तोळे सोनं आणि फॉर्च्यूनर गाडी जावयाला दिली होती. आधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठी दिली होती”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,”लग्नानंतर(Marriage) गौरी गणपतीच्या सणात तिच्या सासूने चांदीच्या गौरी मागितल्या. त्याही आम्ही दिल्या. वैष्णवी दीड दोन महिन्यांनी घरी आली की मी तिला ५० हजार, एक लाख रुपये देत होतो. दीड महिन्यांपूर्वी जावयाने माझ्याकडे दीड लाखांचा मोबाईल मागितला होता, तो देखील मी दिला. तरीही सासरच्यांनी तिला खूप मानसिक त्रास दिला”, असे सांगताना वैष्णवीच्या वडिलांचे डोळे पाणावले होते.
वैष्णवीचे वडील पुढे म्हणाले की, “सासरच्या लोकांकडून (People) वैष्णवीला सतत टॉर्चर केले जात होते. तुला स्वयंपाक येत नाही, साफसफाई येत नाही असे सारखे म्हणायचे. आम्ही विचारलं की आमच्याकडे कामाला तीन बाया आहेत तिला याठिकाणी काय काम पडतं असं सांगायचे. पण, आम्ही निघून गेलो की वैष्णवीला पुन्हा त्रास दिला जात होता. त्यानंतर घरी आल्यावर वैष्णवी आम्हाला सगळं सांगायची. तसेच जमीन खरेदीसाठी दोन कोटींची मागणी पूर्ण न केल्याने तिचा सासरच्यांनी छळ केल्याचा” आरोपही यावेळी त्यांनी केला.