Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजPune Crime News: "तू वर चढून टॉर्चने चेक कर, अन्…"; पिडीत तरुणीसोबत...

Pune Crime News: “तू वर चढून टॉर्चने चेक कर, अन्…”; पिडीत तरुणीसोबत शिवशाही बसमध्ये नेमके काय घडले?

पुणे | Pune
पुण्याच्या स्वारगेट एसटी स्टँड परिसरात एका पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून स्वारगेटसारख्या गजबजलेल्या एसटी आगारात ही घटना घडलीच कशी, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेने महिलांचसुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. तर, दुसरीकडे आरोपी आणि पीडित तरुणीत काय संवाद झाला, याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांकडून पहिल्यांदाच या प्रकरणाचा सविस्तर तपशील सांगण्यात आला आहे.

स्वारगेट एसटी स्टँडमध्ये घडलेल्या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमांतर्गत संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. दत्तात्रय रामदास गाडे असे फरार आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या मागावर पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे.

- Advertisement -

स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही पुण्यात कामाला होती. घटनेच्या दिवशी ती सकाळी साडेपाच ते पावणेसहा दरम्यान ही तरुणी फलटणला आपल्या गावी निघाली होती. त्यासाठी ही तरुणी स्वारगेट डेपोत आली. त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीच्या आजुबाजूला घुटमळत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

काही वेळाने आरोपी तिच्या बाजूला येऊन बसला आणि तिची विचारपूस करु लागला. आरोपीने तिला कुठे जायचे असे विचारले. तेव्हा तिने फलटणला जातेय, असे सांगितले. तेव्हा त्याने सातारला जाणारी बस येथे लागत नाही असे सांगून तिला दुसरीकडे नेले, ही मुलगी बसजवळ पोहोचली तेव्हा अंधार होता. त्यामुळे तिला बसमध्ये चढायचे की नाही, हा प्रश्न पडला. त्यावर आरोपीने म्हटले की, रात्रीची बस आहे, लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहेत. तू वर चढून टॉर्चने चेक कर. त्यानंतर ही तरुणी बसच्या आतमध्ये गेली तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावून घेतला. यानंतर आरोपीने तरुणीवर अतिप्रसंग केला. अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला. त्यानंतर मुलगीही बसमधून खाली उतरली. ती दुसऱ्या बसमध्ये बसून आपल्या गावी जात होती, तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि घडलेला प्रसंग सांगितला. मित्राने सांगितल्यावर ही तरुणी पोलीस ठाण्यात आली आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. अशी माहिती पुणे पोलिस डिसीपी स्मार्थना पाटील यांनी दिली आहे.

पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आम्ही आरोपीचा शोध सुरू केला आहे. आरोपी जामिनावर सुटलेला असून शिरूर गावातील रहिवाशी आहे. सीसीटीव्हीत आरोपी दिसत असून आरोपीला शोधण्यासाठी ८ टिम शोधत आहेत’, असेही त्यांनी म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...