Thursday, March 13, 2025
Homeक्राईमPune Crime: कल्याणनंतर पुणे हादरलं! सख्ख्या लहान बहिणींची हत्या; मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत...

Pune Crime: कल्याणनंतर पुणे हादरलं! सख्ख्या लहान बहिणींची हत्या; मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडल्याने खळबळ

पुणे | Pune
पुण्यातील राजगुरूनगर येथे घराजवळ काल दुपारी (बुधवारी) खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजुला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये आढळून आले आहेत. आठ आणि नऊ वर्षीय अशा दोन सख्ख्या चिमुकल्या बहिणींची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. दोघीही बहिणींचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले होते. त्यामुळे राजगुरुनगरमध्ये एकच खळबळ माजली आहे.

राजगुरुनगर शहरातून दोन्ही बहिणी बुधवारी बेपत्ता झाल्या होत्या. काल दुपारी दोन्ही बहिणी घराजवळ खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजुला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले होते. पिडित मुलींच्या शेजाऱ्यानेच हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणी होत्या. पीडित कुटुंबाच्या घराच्या वर एक आचारी राहायला आहे. त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या आचाऱ्याने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणले आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध केला, आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. आता आपले बिंग फुटेल या भीतीने तिने एका बहिणीचा जीव घेतला. त्यानंतर दुसरी बहिणीमुळे घडलेला सगळा प्रकार उघड होईल या भीतीने त्याने तिचाही तशाच प्रकारे जीव घेतला. यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमरातीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले.

राजगुरूनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता, या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी आचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तर दोन्ही बहिणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवले आहेत, या अहवालातून नेमके काय-काय घडले हे स्पष्ट होईल.

कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या
कल्याण येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या करण्यापूर्वी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर वातवरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...