Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रपुणे : करोनाने सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

पुणे : करोनाने सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – करोना संसर्गामुळे आज आणखी एका पोलीस कर्मचार्‍याला आपला जीव गमवावा लागला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोपट लोंढे यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर भारती रुग्णालय धनकवडी येथे उपचार सुरू असताना दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. राज्यात आत्तापर्यंत करोनाने चार पोलिसांचा जीव घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच वय वर्ष 55 वरील पोलीस कर्मचार्‍यांना कर्तव्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

57 वर्षीय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोंढे यांना करोनाची लागण झाली होती. ते पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास भारती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

यापूर्वी करोना विषाणूचा संसर्ग झाल्याने हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदुरकर, संदीप सुर्वे आणि कॉन्टेबल शिवाजी सोनावणे यांचा मुंबईत मृत्यू झाला. तर, आज फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर धनकवडी येथील भारती रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. राज्यात आत्तापर्यंत करोनाने चार पोलिसांचा जीव घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच वय वर्ष 55 वरील पोलीस कर्मचार्‍यांना कर्तव्यावर येण्यास मनाई करण्यात आली आहे.
50 लाखांचं कवच

राज्यात आतापर्यंत 300 हून अधिक पोलीस कर्मचार्‍यांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, चार पोलिसांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर करोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस दल करोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचार्‍याचा करोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या