Friday, May 3, 2024
Homeनगरपावसाने ओढ दिल्यामुळे पुणतांबा परिसरातील शेतकरी हवालदिल

पावसाने ओढ दिल्यामुळे पुणतांबा परिसरातील शेतकरी हवालदिल

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

परिसरात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न पडल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. 12 दिवसांपूर्वी परिसरात 37 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे परिसरात खरीप पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. विशेष म्हणजे बहुतांशी शेतकरी वर्गाने खरिपांच्या पेरणीसाठी आवश्यक मशागती केल्या आहेत. तसेच पेरणीसाठी आवश्यक बी-बियाणे तसेच रासायनिक खतांची जुळवाजुळव करून ठेवलेली आहे. आता फक्त बळीराजा वरुणराजाची वाट पाहत आहे.

- Advertisement -

मागील वर्षी सोयाबीन पिकाला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे चालू वर्षी बहुतांशी शेतकर्‍यांचा कलही सोयाबीन पिकाला आहे. मका पिकाचेही भाव टिकून असल्यामुळे मका पेरणीकडे सुद्धा शेतकरी वर्गाचा कल आहे. येत्या सात आठ दिवसात पेरणीयोग्य पाऊस पडला नाही तर परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.

सध्या परिसरातील ओढे, नाले, बंधारे कोरडे पडले आहेत. तसेच विहिरीच्या पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे पाणी टंचाई बरोबरच जनावराच्या चार्‍याची टंचाई जाणवण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे येथील बाजारपेठ ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. शेतकरी वर्गाबरोबरच ग्रामस्थ, व्यापारी वर्गात सुद्धा चिंतेचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या