सौ.वंदना अनिल दिवाणे
जुलै – 2023
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी-शुक्र , द्विेतीयात मंगळ, चतुर्थात-केतू , सप्तमात प्लूटो, अष्टमात शनी, नवमात नेपच्यून, दशमात गुरू-राहू-हर्षल, व्ययात रवि-बुध अशी ग्रहस्थिती आहे.
तुमची रास – राशीची आद्याक्षरे ही, हू, हे, हो, डा,डी, डू, डे, डो अशी आहेत. राशीेचे चिन्ह खेकडा आहे. राशी स्वामी चंद्र. तत्व- जल, चर राशी असल्याने स्वभाव चंचल. उत्तर दिशा फायद्याची आहे. सत्वगुणी, वर्ण ब्राह्मण, स्वभाव-सौम्य, कफ प्रवृत्ती, राशीचा अंमल छातीवर आहे. शुभ रत्न-मोती,शुभ रंग-पांढरा, क्रीम, शुभ दिवस-सोमवार, शंकराची उपासना फायद्याची राहील. शुभ अंक-2, शुभ तारखा-2/11/20/29. मित्र राशी- वृश्चिक,मीन,तुला, शत्रुराशी- मेष. सिंह, धनु, मिथून, मकर, कुंभ. अध्ययनाची आवड. जलप्रिय, भावनाप्रधान, कुशल प्रबंधक, कल्पनाशील, योजना तयार करण्यात प्रविण, भावुक, विचारी, परोपरकारी, ईश्वरभक्तीत रस.
लग्नी शुक्र आहे. व्यक्तीमत्वाला झळाळी येईल. नेहमी कामात दंग रहाल. स्वतःची जागा व संसार याबद्दल फार प्रेम वाटेल. हरहुन्नरीपणामुळे कोणतेही नवीन काम लवकर आत्मसात करून त्यापासून धनप्राप्ती कराल. कामात व्यस्त रहाणे आवडते.
स्त्रियांसाठी – लग्नी शुक्र आहे. सौदर्यवर्धक, सुपुत्र सुख प्रदान करणारा, कलाकौशल्यासाठी प्रगतिकारक तर आहेच शिवाय हौस मौज करण्यासाठी पूरक आहे. स्त्री जीवनाचा खर्या अर्थाने उपभोग घ्याल.
विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.
शुभ तारखा – 3, 7, 8, 10,11, 19, 23, 24, 26, 28
ऑगस्ट – 2023
महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी रवि, द्वितीयात -मंगळ-बुध-शुक्र, चतुर्थात केतू, सप्तमात प्लूटो, अष्टमात शनी,नवमात नेपच्यून, दशमात गुरू-राहू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.
राशीच्या द्वितीयस्थानी बुध आहे. धनस्थानातील बुध सांपत्तिक भरभराट प्राप्त करून देतो. कमिशन बेसीस वर चालणारे धंदे, सल्ला मसलत देणे, लेखन, प्रकाशन, यापासून उत्तम धनप्राप्ती होईल. धनसंग्रहास हा महिना चांगला आहे. बचत शक्य होईल. मात्र सध्याच्या काळी बचत संंस्थातील अनिश्चीतता पाहून योग्य व सुरक्षित सरकारी बँका किंवा वित्त संस्थातूनच गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरेल. अभ्यास केल्यास वक्तृत्व कलेत उत्तम प्रगती करू शकाल. व्यापारी वर्गास हा महिना उलाढालीच्या दृष्टीने चांगला जाईल. धनप्राप्ती स्वतःच्या पराक्रमाने होईल. कोणापुढे हात पसरावा लागणार नाही. प्रवासात आपले सामान, पैसे चोरीला जाऊ नये याची काळजी घ्यावी. वाचून पाहिल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करू नये.
धनस्थानातील मंगळ आर्थिक आवक वाढवील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पशूपासून पिडा संभवते.
स्त्रियांसाठी – द्वितीयात शुक्र आहे. हातात पैसा खेळता राहील. पतिराज खुष राहतील. मधुर बोलण्यामुळे घराकडे तणाव फिरकणार नाही. विद्येेच्या जोरावर धनप्राप्ती कराल.
विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांची बुद्धी तीक्ष्ण असल्यामुळे परीक्षा देणे अवघड जाणार नाही. लेखनाचा सराव जितका वाढवाल टक्केवारी तेवढीच वाढेल.
शुभ तारखा – 2, 3, 5, 8, 12, 15, 17, 18, 19, 21, 22, 28, 29
सप्टेंबर – 2023
महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी शुक्र, द्वितीयात रवि-बुध, तृतीयात मंगळ, चतुर्थात केतूप सप्तमात प्लूटो, अष्टमात .शनी, नवमात नेपच्यून, दशमात गुरू-हर्षल अशी ग्रहस्थिती आहे.
दशमस्थानी गुरु आहे. पराक्रमाला जोर येईल. बर्याच वेळा त्यात यश मिळेल. स्थावर इस्टेटीपासून उपजिवीका होण्याइतके उत्पन्न मिळू शकेल. तेजस्वी वृत्ती राहील. उत्तम सल्लागार म्हणून प्रसिद्धी मिळेल. सारचे रागावणे चांगले नाही. त्यावर नियंत्रण ठेवा. हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय चैन पडणार नाही. गुरूजनांवर प्रेम राहील. धैर्यशील वृत्ती मुळे कोणत्याही संकटात माघार घ्यावी लागणार नाही. वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागणार नाही. जनसेवेची हौस वाटेल. व्यापार वैद्यकीय यांत्रिकी कामे अथवा राजकृपा यातून अर्थप्राप्ती होईल.
षष्ठात शनी आहे. शत्रुवर मात कराल. शत्रुचा पराभव मोठ्या कौशल्याने करू शकाल. थोर लोकांशी मैत्री होईल. देश व स्वधर्म याबद्दल आदर वाटेल. हाताखालचे लोक खूष रहातील. हातून सत्कर्मे घडतील. ग्रमीण भागातील शेतकर्यांना पशूधनापासून धनप्राप्ती होईल. अध्यात्माची आवड वाटेल. गूढशास्त्राचे आकर्षण वाटेल.
स्त्रियांसाठी – महिलांचा स्वभाव प्रेमळ राहील. कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवण्याची वृत्ती राहील. हे मात्र धोक्याचे राहील. सोने म्हणून पितळ हाती लागण्याचा संभव आहे.
विद्यार्थ्यांसाठी- विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. खेळ व टी,व्ही. यांकडे दुर्लक्ष करावेश आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.
शुभ तारखा – 1, 3, 4, 7, 8, 10, 11, 16, 17, 18, 19, 22, 24, 26, 27, 29, 30