Sunday, May 19, 2024
Homeजळगावचाळीसगाव: युरिया खतासाठी कृषी केंद्राबाहेर शेतकर्‍यांच्या रांगा

चाळीसगाव: युरिया खतासाठी कृषी केंद्राबाहेर शेतकर्‍यांच्या रांगा

चाळीसगाव | प्रतिनिधी Chalisgaon

तालुक्यात युरिया खत साठा संपल्याने, तसेच काहींनी युरियाची साठेमारी केल्याने शेतकर्‍यांना बर्‍याच दिवसांपासून युरिया उपलब्ध होत नव्हता, परंतू आमदारांच्या मदतीने आमळनेर येथून युरियाचा काही प्रमाणात साठा बुधवारी मागविण्यात आला होता. युरिया मिळणार असल्यामुळे शेतकर्‍यांनी संकाळापासून कृषी केंद्र दुकानाच्या बाहेर रांगा लावल्याचे दिसून आले.

- Advertisement -

मात्र त्यापैकी बोटावर मोजण्या इतक्याच शेतकर्‍यांना युरिया मिळाला, तर बाकी शेतकरी आल्या पायी वापस केले. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान चाळीसगावसाठी मागविण्यात आलेला युरियाचा रॅक अजुन उपलब्ध न झाल्यामुळे युरियाचा तुटवडा निर्माण झाला असून चाळीसगावचा रॅक आल्यावर गरजवंत सर्व शेतकर्‍यांना युरिया मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे.

तालुक्यात गेल्या आठवड्यात बक्यापैकी पाऊस झाल्यानंतर शेतातील उगवलेली पीके तरारली असून आता त्या पीकांना यूरीया या खताची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून चाळीसगांव तालुक्यात युरीयाची टंचाई निर्माण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कृषी केंद्रांवर युरीया शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत होते.

शहर व तालुक्यात युरिया मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरी बांधवानी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडे केल्या होत्या. आमदारांनी तात्काळ यांची दखल घेत, अमळनेर येथे आलेल्या युरियाच्या रॅकमधून काही प्रमाणात युरिया चाळीसगावसाठी देण्याची विनंती केल्यानतंर चाळीसगावसाठी काही प्रमाणात युरिया उपलब्ध झाला. तालुक्यात कृषी केंद्रांवर युरीयाचे वाटप होणार असल्याचे कालच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी मोठा गाजा-वाज करत, तसेच काहीना हाताशी धरुण सोशल मिडियाच्या माद्यामाधून तसा मॅसेज व्हायर केला होता. त्यामुळे शेतकर्‍यांना युरिया मिळणार असल्याचे समजाताच त्यांनी आनंद व्यक्त केला.

तसेच युरिया घेण्यासाठी संकाळी उठुन त्यांनी चाळीसगाव गाठले, संकाळपासूनच शहरातील कृषीकेंद्राबाहेर शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. ही गर्दी पहाता कृषी केंद्र चालकांनीही कृषीकेंद्रावर काही अनुचीत प्रकार घडूनये म्हणून पोलीस बंदोबस्तही मागवला होता.

मात्र संकाळी दहा वाजेपर्यंत काही कृषी केंद्रांवर युरीयाचे वाटप होतांनाच एका आधारकार्डसाठी अवघ्या दोनच गोण्या मिळणार असल्याचे कृषी केंद्र चालकांनी शेतकर्‍यांना सांगीतल्यानंतर मात्र काही शेतकर्‍यांमध्ये त्यांच्याकडे असलेल्या जमिनीसाठी तेवढा यूरीया पुरेसा नसल्याने अशा शेतकर्‍यांच्या पदरी पुन्हा निराशा पडल्याचे दिसून आले. तर काही केंद्रांवर युरीयाच दुपारपर्यंतआला नसल्याने अशा दुकानांबाहेर शेतकर्‍यांच्या मोठ्या रांगा लागल्या असल्याचे दिसून आले.

तसेच मर्यादीत साठा असल्यामुळे काही शेतकर्‍यांना युरिया न मिळल्यामुळे, त्यांनी संताप व्यक्त करुन परतीचा मार्ग धरला.

- Advertisment -

ताज्या बातम्या