Friday, May 3, 2024
Homeनाशिकसुरगाणा : रब्बीची २ हजार ५८८ हेक्टरमध्ये पेरणी

सुरगाणा : रब्बीची २ हजार ५८८ हेक्टरमध्ये पेरणी

दिंडोरी । सुरगाणा Surgana

तालुक्यात महसूल मंडळनिहाय अंतिम पेरणी अहवालानुसार रब्बी हंगामातील पीक पेरणी एकूण 2588 हेक्टरवर झाली आहे.

- Advertisement -

पाच महसूल मंडळ असलेल्या या तालुक्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, मसूर, ज्वारी आदी पीक पेरणी झाली. गेल्या सप्ताहात दोन दिवस बदललेले वातावरण आणि तुरळक प्रमाणात पाऊस झाला.

मात्र कुठेही नुकसान झाले नसल्याची माहिती कृषी अधिकारी रहाणे यांनी दिली. मात्र काही ठिकाणी खरीप हंगामातील कापून ठेवलेल्या व शेतात उभ्या भाताचे काही प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या