अमळनेर – amalner
अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साने गुरुजी यांच्या कर्मभूमीत होणाऱ्या या संमेलनासाठी अध्यक्षांची निवड जाहीर झाली आहे. संमेलन अध्यक्षपदी रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे येथे रविवारी झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत रवींद्र शोभणे यांचे नाव निश्चित करण्यात आले.
- Advertisement -
प्रसिद्ध कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ कादंबरीकार डॉ.रवींद्र शोभणे, ज्येष्ठ बाल साहित्यिक न.म.जोशी यांची नावेही अध्यक्षपदासाठी चर्चेत होती. परंतु शोभणे यांचे नाव बहुमताने निवडण्यात आले. बैठकीत संमेलनाच्या तारखांवरही विचार करण्यात आला. दि.२ फेब्रुवारी २०२४ पासून हे साहित्य संमेलन होणार आहे.