Sunday, May 19, 2024
Homeजळगावनिविदा घेण्याच्या कारणावरुन पीडब्लूडीमध्ये राडा

निविदा घेण्याच्या कारणावरुन पीडब्लूडीमध्ये राडा

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

पारोळा (Parola) तालुक्यातील रस्त्यांची निविदा (Tender of roads) घेण्याच्या कारणावरुन आमदार चिमणराव पाटील यांचा पुतण्या समीर वसंतराव पाटील (Sameer Vasantrao Patil) याच्या कारवर दगडफेक (Throwing stones at the car) करुन कारच्या काचा फोडल्या. तसेच शिवीगाळ करत निविदा घेतली तर जीवंत ठार मारण्याची धमकीही दिल्याची घटना गुरुवार, 21 ऑक्टोंबर रोजी जळगाव शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Department of Public Works) कार्यालयात घडली. याप्रकरणी रात्री जिल्हापेठ पोलीस (District Peth Police) ठाण्यात राहूल शांताराम सोनवणेसह (Rahul Shantaram Sonawane) त्याच्या सोबतच्या सात ते आठ जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, समीर पाटील व सचिन सनेर दोघं मित्र शासकीय ठेकेदार असून सचिन यांनी पारोळा तालुक्यातील आमलोद मोळ, शाहदा सांगवी, हातेड अमळनेर, भडगाव पारोळा रस्त्यासाठी निविदा भरली होती. या निविदा गुरुवारी उघडल्या जाणार होत्या. सचिन बाहेरगावी असल्याने त्यांच्या जागी समीर पाटील हे गुरुवारी त्यांच्या एम.एच.19 बी.यु.3300 या क्रमाकांच्या कारने जळगावला आले. दुपारी 1 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागात प्रवेश करणार तोच राहूल शांताराम सोनवणे व इतर सात ते आठ जणांनी कार अडविली. सर्वांनी कारला लाथाबुक्के मारले. तर काही जणांनी कारवर दगड मारुन फेकले. यात कारच्या काचा फुटल्या.

…अन् तक्रारीसाठी पोलीस ठाणे गाठले

काही जण गाडीवर हल्ला करीत असताना राहूल सोनवणे समीर यांना शिवीगाळ करुन ओरडत होते. तुम्हाला माज आलाय, तुम्ही कसे काय टेंडर भरले, तुम्हाला पाहून घेईल, जीवंत सोडणार नाही असे म्हणत खिशातून फायटर काढून हातात घातले. मारणार तितक्यात समीर याचे चालक उज्ज्वल कडू चव्हाण यांनी कार पुढे घेतली. स्वत:चा बचाव करण्यासाठी ते तेथून सरळ पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे निघाले. त्यानंतर राहूल सोनवणे यांनी सचिन सनेर यांनाही फोन करुन अश्लील शिवीगाळ करत तू कसा टेंडर घ्यायला येतो अशी दमदाटी केली. दरम्यान, समीर पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली, सोबत मोबाईलवरील संभाषणाचे रेकॉर्डींगही सादर केले. दरम्यान जीव वाचविण्यासाठी समीर पाटील यांना अक्षरश: तेथून पळ काढावा लागल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या