Wednesday, February 4, 2026
HomeनगरRadhakrishna Vikhe Patil : त्यांनी दहा वर्ष काय केलं?; ना. विखे यांचा...

Radhakrishna Vikhe Patil : त्यांनी दहा वर्ष काय केलं?; ना. विखे यांचा जाणत्या राजांना सवाल

अहिल्यानगर । प्रतिनिधी

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखानदारीच्या मुद्यावरून “जनाची नाही तर मनाची ठेवा” असा टोला लगावल्यामुळे तो उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आहे असा समज पसरला होता.

- Advertisement -

या गैरसमजाला छेद देत विखे पाटील म्हणाले, मी अजित पवारांवर टीका केलेली नाही. माझा सवाल जाणत्या राजांकडे (शरद पवार) होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते आम्हाला घेऊन फिरत, आयकर माफी व इथेनॉल धोरणाचे आश्वासन देत होते. मात्र मंत्रीपदावर राहूनही त्यांनी ना आयकर माफी दिली, ना इथेनॉल धोरण आणलं. मग त्यांनी दहा वर्ष काय केलं, हा माझा प्रश्न आहे.

YouTube video player

७९ व्या स्वातंत्र्यदिन निमित्ताने येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात ना. विखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विखे पाटील यांनी पुढे सांगितले की, आमच्या सरकारने आज इथेनॉल धोरण आणले असून १५ हजार कोटी रुपयांची आयकर माफी दिली आहे. आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करत आहोत. पण भूतकाळात जाणत्या राजांनी तसे काही केले नाही. म्हणूनच मी जनाची नाही तर मनाची ठेवा असं म्हटलं होतं.

यावेळी त्यांनी इतरही मुद्यांवर प्रतिक्रिया दिल्या. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या मांसबंदी निर्णयाबाबत ते म्हणाले, “हा नॉन-इशू असून विरोधकांकडे करण्यासारखं काहीच शिल्लक नसल्यामुळे ते अशा मुद्द्यांवरून गोंधळ घालत आहेत. आरोप-प्रत्यारोपाऐवजी त्यांनी गरीब मुलं दत्तक घेऊन चांगलं काम करावं.”

खासदार संजय राऊत यांच्या महायुती सरकार फार काळ टिकणार नाही या वक्तव्यावर पलटवार करताना विखे म्हणाले, २०१९ मध्ये भाजपाच्या आधारावर

ताज्या बातम्या

MLA Manikrao Kokate : आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृशोक

0
सिन्नर | प्रतिनिधी सिन्नर तालुक्याचे आमदार, माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे वडील, कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव मुरलीधर कोकाटे(९३) यांचे आज...