Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशराफेलचा वायुसेनेत 10 सप्टेंबरला औपचारिक समावेश

राफेलचा वायुसेनेत 10 सप्टेंबरला औपचारिक समावेश

नवी दिल्ली | New Delhi –

- Advertisement -

येत्या 10 सप्टेंबरला भारतीय वायुदलात पाच राफेल लढाऊ विमाने दाखल होणार असून या औपचारिक सोहळ्यात

फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली या उपस्थित राहणार आहे. यानिमित्त सामरिक संबंध वाढविण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथिंसह, पार्ली यांच्याशी चर्चा करणार आहे.Rafale

फ्रान्स एरो स्पेसव्दारे निर्मित पाच राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचे आगमन 29 जुलै रोजी अंबालास्थित हवाईतळावर झाले होते. या राफेल विमानांचा भारतीय वायुदलात समावेश करण्याचा अद्याप औपचारिकपणे कार्यक्रम झाला नव्हता. अंबालास्थित हवाई तळावर 10 सप्टेंबरला आयोजित औपचारिक सोहळ्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंहतिन्ही सशस्त्र दलाचे सेनापती जनरल बिपीन रावत व देशातील वरिष्ठ लष्करी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

2 जून रोजी राजनाथ सिंहयांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संवाद साधताना फ्रान्सच्या संरक्षण मंत्री पार्ली यांनी द्विपक्षीय संरक्षण संबंध वाढविण्यासाठी भारतभेटीची तयारी दर्शविली होती. सप्टेंबर 2016 मध्ये भारताने फ्रान्ससोबत 58 हजार कोटी रुपये किंमतीच्या 36 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी आंतर-सरकार करारावर स्वाक्षरी केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या