Thursday, May 2, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात 190 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

राहाता तालुक्यात 190 अ‍ॅक्टीव्ह करोना रुग्ण

राहाता |का. प्रतिनिधी| Rahata

राहाता (Rahata) तालुक्यात 25 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) दिसून येत आहे. काल 16 रुग्ण बरे होऊन गेल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 190 झाली आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यात (Rahata) आतापर्यंत 21359 करोनाबाधित रुग्ण (Covid 19 Positive Patient) आढळून आले. तर 21203 रुग्ण बरे होवून घरी गेले.

खासगी रुग्णालयात 11 तर अँटीजेन चाचणीत 14 रुग्ण आढळून आले आहेत. राहाता तालुक्यातील अस्तगाव-01, ममदापूर-01, पिंपरी निर्मळ-02, एकरुखे-01, दाढ बुद्रुक-05, लोणी बुद्रुक-03, गोगलगाव-01 डोर्‍हाळे-04 केलवड बुद्रुक-02, बाभळेश्वर बुदुक-01, हनुमंतगाव-01, असे एकूण 22, व शिर्डी-00, राहाता-02, अन्य तालुक्यातील-01, असे एकूण 25 रुग्ण आढळून आले आहेत.काल 25 करोना करोना बाधित रुग्ण आढळून आले असून गेल्या दोन दिवसापासून रुग्णांचा आकडा चढता होता मात्र काल पुन्हा दिलास मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या