Friday, May 3, 2024
Homeनगरदेशातील पहिल्या पथदर्शी आदिवासी गृह प्रकल्पाचे लोकार्पण

देशातील पहिल्या पथदर्शी आदिवासी गृह प्रकल्पाचे लोकार्पण

लोणी | वार्ताहर

मागेल त्‍याला हक्‍काचे घर या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या संकल्‍पनेला लोणी बुद्रूक ग्रामपंचायतीने प्रत्‍यक्ष कृतीत उतरवून ६० कुटूंबियांना आहे त्‍याच जागेवर हक्‍काच्‍या घराचा आधार मिळवून दिला आहे.

- Advertisement -

भाजप नेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली साकार झालेला सिंधूताई विखे पाटील निवाऱ्याच्या पथदर्शी गृहप्रकल्‍प देशापुढे ग्रामीण विकासाचा अनोखा उपक्रम ठरला आहे.

लोणी बुद्रूक गावात शासकीय जागेवरच आदिवासी व इतर समाजातील कुटूंब गेली अनेक वर्षांपासुन राहात होती. पंचायत समितीच्‍या माध्‍यमातून शासकीय योजनेतील घरकुल या कुटूंबियांना मंजुरही होत होती. परंतू सदरची जागा त्‍यांच्‍या नावे नसल्‍याने मंजुर झालेली घरकुल सातत्‍याने रद्द झाली. या रहिवाश्‍यांना घराची उपलब्‍धता नसल्‍यामुळे नैसर्गिक आपत्‍तीतही मोठ्या संकटाचा सामना करावा लागला.

- Advertisment -

ताज्या बातम्या