राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) आज मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त 1600 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या (Onion) 7510 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 1200 रुपये ते 1600 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 800 ते 1150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 600 रुपये ते 1000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 रुपये ते 400 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 4790 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 151 रुपये ते 255 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 91 रुपये ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 90 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 रुपये ते 50 रुपये भाव मिळाला.
सोयाबीनचा (Soybeans) सरासरी भाव 4200 रुपये होता. मुग किमान 5100 रुपये, जास्तीत जास्त 5900 रुपये, तर सरासरी 5500 रुपये होता. ज्वारीचा सरासरी भाव 2176 रुपये प्रती क्विंटल होता. संत्र्याचा भाव 30 ते 40 रुपये तर सरासरी 35 रुपये प्रति किलो होता. ड्रॅगन फ्रूटचा (Dragon Fruit) भाव 35 ते 70 रुपये, तर सरासरी 50 रुपये प्रति किलो होता. पेरूच्या 44 क्रेट्सची आवक झाली. पेरूला (Guava) प्रति किलो 7.50 ते 10 रुपये तर सरासरी 8.75 रुपये भाव मिळाला. सीताफळाची 8 क्रेट्सची आवक झाली. सीताफळाला किमान 10 रुपये, जास्तीत जास्त 42.50 रुपये तर सरासरी 25 रुपये भाव मिळाला.





