Wednesday, January 7, 2026
HomeनगरOnion Price : राहाता बाजार समितीत गोणीतील कांद्याला काय मिळतोय भाव?

Onion Price : राहाता बाजार समितीत गोणीतील कांद्याला काय मिळतोय भाव?

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) रविवारी कांद्याला 1800 रुपये भाव मिळाला. कांद्याच्या (Onion) 4303 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 1400 रुपये ते 1800 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 900 ते 1350 रुपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 400 ते 850 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला 500 रुपये ते 1100 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला (Onion) 200 रुपये ते 400 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाच्या (Pomegranate) 55 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला प्रति किलो 111 ते 155 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 71 ते 110 रुपये, डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 41 ते 70 रुपये, डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

YouTube video player

सीताफळाच्या 127 कॅरेटची आवक झाली. सीताफळाला प्रति किलो 10 ते 32 रुपये, तर सरासरी 20 रुपये भाव मिळाला. संत्रीच्या 28 क्रेट्सची आवक झाली. संत्रीला प्रति किलो 17 ते 40 रुपये तर सरासरी 28 रुपये भाव मिळाला. पेरूच्या (Guava) 26 क्रेट्सची आवक झाली. पेरूला 10 ते 17 रुपये, तर सरासरी 14 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...