Thursday, May 2, 2024
Homeनगरराहाता बाजार समितीत कांद्याची एवढी आवक

राहाता बाजार समितीत कांद्याची एवढी आवक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला (Onion) मंगळवारी 900 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

बारसू रिफायनरीसाठी सुरु असलेली दडपशाही आणि सर्वेक्षण तात्काळ थांबवा

आज बाजार समितीत 8967 गोणी कांद्याची (Onion) आवक झाली. प्रतवारीनुसार कांदा नंबर 1 ला 700 ते 900 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 350 ते 650 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 150 ते 550 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 450 ते 550 रुपये. जोड कांदा (Onion) 100 ते 150 रुपये. असा भाव मिळाला.

कुप्रसिद्ध नगर-मनमाड रस्ता इतकी वर्ष का रखडला

सोयाबीनला (Soybeans) आज (मंगळवार) कमीत कमी 4652 रुपये भाव मिळाला. जास्तीत जास्त 4901 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 4800 रुपये भाव मिळाला. गहु किमान 2067 रुपये, जास्तीत जास्त 2270 रुपये. तर सरासरी 2175 रुपये भाव मिळाला. मकाला (Corn) सरासरी 1750 रुपये भाव मिळाला. हरभरा (Gram) सरासरी 4601 रुपये.

श्रीरामपुरात दोन गटामध्ये राडा कट्ट्यातून गोळीबार: एक अत्यावस्थ

मोसंबीला किमान 1000 रुपये, जास्तीत जास्त 2500 रुपये, तर सरासरी 2000 रुपये. चिकुला सरासरी 1750 रुपये भाव मिळाला.

डाळींबाच्या 152 क्रेटसची आवक झाली. प्रतवारीनुसार डाळींब (Pomegranate) नंबर 1 ला 71 ते 105 रुपये प्रतिकिलो. डाळींब नंबर 2 ला 46 ते 70 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 3 ला 21 ते 45 रुपये. डाळींब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 20 रुपये, असा भाव मिळाला अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या