राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी डाळिंबाला सर्वाधिक 255 रुपये किलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या 1625 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 191 रुपये ते 255 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 121 ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 61 रुपये ते 120 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये भाव मिळाला.
- Advertisement -

गव्हाची 15 क्विंटल आवक झाली. गव्हाला किमान 2351 रुपये, जास्तीत जास्त 2500 रुपये, तर सरासरी 2400 रुपये भाव मिळाला. मकाला सरासरी 1502 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. ज्वारीला सरासरी 1851 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.




