Friday, May 16, 2025
Homeनगरराहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी डाळिंबाला जास्तीत जास्त 355 रुपये प्रति किलोलोला भाव मिळाला. राहाता बाजार समितीत डाळिंबाची (Pomegranate) 4501 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 251 ते 355 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 151 रुपये ते 250 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 71 ते 150 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 70 रुपये भाव मिळाला.

पेरूच्या 31 कॅरेटची आवक झाली. पेरूला (Guava) 2000 ते 6000 रुपये तर सरासरी 4000 रुपये भाव प्रतीक्विंटलला मिळाला. सीताफळाच्या 5 क्रेट्स ची आवक झाली. सीताफळाला किमान 1500 रुपये, जास्तीत जास्त 4000 रुपये तर सरासरी 2500 रुपये प्रतीक्विंटलला भाव मिळाला. बाजार समितीच्या कोल्हार बु. उपशाखेत सोयाबीनची 50 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला (Soybeans) 3825 ते 4080 रुपये, तर सरासरी 4000 रुपये भाव मिळाला. गहू 2726 ते 2875 रुपये. तर सरासरी 2876 रुपये. मकाला सरासरी 2571 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राजनाथ

Rajanath Singh: ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. त्यांनी जवानांची भेट घेत त्यांचे भरभरून कौतुक केले....