Friday, April 10, 2026
Homeनगरराहाता बाजार समितीत सोयाबीन 5901 रुपये प्रतिक्विंटल

राहाता बाजार समितीत सोयाबीन 5901 रुपये प्रतिक्विंटल

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

राहाता बाजार समितीत काल बुधवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 2822 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्ती जास्त 2500 तर लाल कांद्यालाही 2500 रुपये इतका भाव मिळाला. तर सोयाबीनला जास्तीत जास्त 5901 रुपये इतका भाव मिळाला.

- Advertisement -

राहाता बाजार समितीत 2 हजार 822 कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. उन्हाळी कांदा नंबर 1 ला 2100 ते 2500 रुपये तर लाल कांद्याला 2200 ते 2500 असा भाव मिळाला. कांदा उन्हाळी नंबर 2 ला 1450 ते 2050 रुपये, लाल कांद्याला 1550 ते 2150 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 600 ते 1400 रुपये तर लाल कांद्याला 700 ते 1500 भाव मिळाला. गोल्टी उन्हाळी कांद्याला 1700 ते 1900 रुपये व लाल कांद्याला 1800 ते 2000 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 100 ते 500 रुपये व लाल कांद्याला 200 ते 600 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या 1296 क्रेटस ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 111 ते 152 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 81 ते 110 रुपये असा भाव मिळाला. डाळींब नंबर 3 ला 41 ते 80 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला.

सोयाबीनची 25 क्विंटल आवक झाली. सोयाबीनला कमीत कमी 5500 ते जास्तीत जास्त 5901 रुपये भाव मिळाला. तर सरासरी 5825 असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला 1600 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. तर सिताफळाच्या 89 क्रेट्सची आवक झाली. सिताफळास कमीत एका क्विंटलला 2000 तर जास्तीत जास्त 5000 रुपये व सरासरी 3500 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

ताज्या बातम्या

IPL 2026 : आज राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीमध्ये गुवाहाटीत लढत; जाणून...

0
गुवाहाटी । Guwahati आयपीएलच्या सोळाव्या सामन्यात आज दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील हा थरार राजस्थानचे...