Saturday, October 17, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) बाजार समिती 3891 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 4100 ते 5500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 2 ला 2600 ते 4050 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 1000 ते 2550 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा (Onion) 1500 ते 3800 रुपये. जोड कांदा 700 ते 1800 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

- Advertisement -

डाळिंबाची (Pomegranate) 8243 क्रेटस्ची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 161 ते 215 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 2 ला 101 ते 160 रुपये. डाळिंब नंबर 3 ला 51 ते 100 रुपये. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 50 रुपये भाव मिळाला. पेरूच्या 12 क्रेटस् ची आवक झाली. पेरूला सरासरी 13 रुपये प्रति किलो भाव मिळाला. सीताफळाच्या 25 क्रेटस् ची आवक झाली. सीताफळाला (Custard Apple) 13 ते 25 रुपये तर सरासरी 15 रुपये प्रति किलोला भाव मिळाला.

ताज्या बातम्या

आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पर्दाफाश; ‘मकोका’ अंतर्गत धडक कारवाई

0
पुणे | प्रतिनिधी शेअर बाजारात जादा परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला असून या...