Sunday, May 19, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात वेगवेगळ्या घटनांत चौघांचा मृत्यू

राहाता तालुक्यात वेगवेगळ्या घटनांत चौघांचा मृत्यू

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यात पुणतांब्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली तर एका तरुणीने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्या केली. तर चौथ्या घटनेत एका महिलेचा आकस्मात मृत्यू झाला. काल तालुक्यात चौघा जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राहाता तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील विजया राजेंद्र कोळपेकर (वय 60) या त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता उपचारापूर्वीच विजया राजेंद्र कोळपेकर यांचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी राहाता पोलिसांत आकस्मात मृत्यू रजिस्टर नं. 21 नुसार नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्री. भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्री. शिंदे तपास करीत आहेत. या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत परिसरात चर्चा सुुरु होती.

तालुक्यातील पुणतांबा गावातील कृषी विद्यापीठाच्या शेतात चिंचेच्या झाडाला धनंजय सुरेश थोरात (वय 23) याने गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. त्याला उपचारासाठी पुणतांब्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झालेला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार राहाता पोलिसांनी आकस्मात मृत्यू रजिस्टर नं. 19 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री. मंडलिक हे पुढील तपास करीत आहेत.

तालुक्यातील पिंपळस परिसरात राहणारी तरुण महिला मीना अविनाश कापसे (वय 35) हिने काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने तिला तातडीने शिर्डी येथील श्रीसाईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या महिलेस वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासले असता ती मयत असल्याचे सांगते. श्रीसाईबाबा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार राहाता पोलिसांनी आकस्मात मृत्यू रजिस्टर नं. 20 नुसार पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

राहाता तालुक्यातील कोल्हार बुदु्रक येथील गंगाधर बालाजी कोळपे(वय 77) यांनी राहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांना तातडीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या अहवालानुसार लोणी पोलिसांत आकस्मात मृत्यू रजिस्टर नं. 41 प्रामाणे लोणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या