Tuesday, October 27, 2026
Homeदेश विदेशराहुल गांधींची अमित शाह मानहानी प्रकरणातून निर्दोष सुटका, सुल्तानपूर कोर्टाचा मोठा दिलासा

राहुल गांधींची अमित शाह मानहानी प्रकरणातून निर्दोष सुटका, सुल्तानपूर कोर्टाचा मोठा दिलासा

नवी दिल्ली | New Delhi
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यात मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील विशेष MP-MLA न्यायालयाने सोमवारी, २६ ऑक्टोबर २०२६ रोजी राहुल गांधी यांची निर्दोष मुक्तता केली. २०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यावरून हा खटला दाखल करण्यात आला होता.

नेमके प्रकरण काय होते?
२०१८ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगळुरू येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबाबत वक्तव्य केले होते. अमित शहा यांचे नाव सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणाशी जोडून त्यांनी भाजपच्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित केला होता. या वक्तव्यामुळे अमित शहा यांची प्रतिष्ठा दुखावल्याचा आरोप करत भाजप नेते विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी सुलतानपूर येथे राहुल गांधी यांच्याविरोधात फौजदारी मानहानीची तक्रार दाखल केली. त्या वेळी मिश्रा हे सुलतानपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष होते. या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत मानहानीचा आरोप करण्यात आला होता. तक्रारदाराच्या मते, राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे अमित शहा यांची सार्वजनिक प्रतिमा मलिन झाली होती.

Special MP/MLA Court in Sultanpur dismisses defamation case against Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi.

Rahul Gandhi appeared before the court for the verdict in a 2018 criminal defamation case. https://t.co/o6umo4uKqv— ANI (@ANI) October 26, 2026

- Advertisement -

राहुल गांधी म्हणाले होते की, “देशातील जनता हे विसरली आहे की, भाजप अध्यक्षांवर हत्येचा आरोप आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्षांवर हत्येचा आरोप आहे, तो पक्ष केवळ प्रामाणिकपणा आणि शुद्धतेबद्दलच बोलतो.” असे विधान केले होते.

जवळपास गेल्या ८ वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होतं. फेब्रुवारी २०२४ मध्ये राहुल गांधींनी स्वत:ला न्यायालयाच्या स्वाधीन केलं. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. जुलै २०२४ मध्ये या प्रकरणात राहुल गांधींचा जबाबदेखी नोंदवण्यात आला होता. याचप्रमाणे न्यायालयात तक्रारदार व प्रत्यक्षदर्शींचीही उलटतपासणी करण्यात आली.

६ ऑक्टोबर २०२६ रोजी या प्रकरणात युक्तिवादाला सुरुवात झाली. १२ ऑक्टोबर रोजी युक्तिवाद संपल्यानंतर न्यायालयाने निकाल देण्यासाठी २६ ऑक्टोबरची तारीख निश्चित केली होती. त्यानुसार, आज या प्रकरणी सुलतानपूर न्यायालयाने निकाल दिला आहे.

ताज्या बातम्या

शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा; कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, ४ लाख १५...

0
मुंबई | Mumbai राज्यातील दुष्काळग्रस्त (Drought) आणि अडचणीत सापडलेल्या बळीराजाला ऐन सणासुदीच्या काळात दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने (State Government) मोठा निर्णय घेतला आहे. 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी...