Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यांत ८% मतदार वाढले; राहुल गांधींचा...

Rahul Gandhi: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यांत ८% मतदार वाढले; राहुल गांधींचा मोठा दावा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानात मोठा घोळ झाल्याचा दावा सातत्याने केला आहे. त्यांनी वेगवेगळ्या अहवालांचा दाखला देत मतदानाच्या दिवशी शेवटच्या तासांत वाढलेल्या मतदानाची आकडेवारी, वाढलेले मतदार यासह मतदानाच्या निकालावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी एका दैनिकात थेट लेख लिहून या निवडणुकीच्या प्रक्रियेवर बोट ठेवले होते. आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकली असा दावा केला आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील मतदार यादीत गेल्या ५ महिन्यांत तब्बल ८% वाढ झाली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधींनी ‘एक्स’वर पोस्ट करत हे आरोप केले आहे. तर काही बूथवर २०-५०% वाढ झाली आहे. सोबतच BLO नी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचेही यात म्हटले आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत गडबड घोटाळा होत असतानाही निवडणूक आयोग गप्प का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

काही अनोळखी माणसांनी मतदान केल्याची बीएलओ म्हणजे बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. हजारो मतदारांचे पत्ते हे अयोग्य पद्धतीचे असल्याचे माध्यमांनी ही स्पष्ट केले आहे” न्यूज लाँड्रीच्या अहवालाचा दाखला देत राहुल गांधींनी हा आरोप केला. ‘निवडणूक आयोग गप्प का? ही मतदारांची एका अर्थी चोरीच’ असे राहुल गांधी यांनी म्हटलेय. म्हणून आम्ही सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतोय असे राहुल गांधी म्हणाले.

YouTube video player

राहुल गांधींनी एक्स पोस्टमध्ये काय म्हंटले आहे?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात, मतदार यादीत फक्त 5 महिन्यांत 8% वाढ झाली. तर काही बूथवर 20 ते 25 % वाढ झाली. तसेच बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे नोंदवले. पडताळणी केलेल्या पत्त्याशिवाय हजारो मतदारांना उघड केले. असे सर्व सुरू असताना निवडणूक आयोग गप्प आहे की यात सहभागी आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. शिवाय म्हणूनच आम्ही मशीन-रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करतोय. असेही राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

बिहार यूथ काँग्रेसने म्हटले आहे की “देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात सहा महिन्यांमध्ये २९,२१९ नवे मतदार आले आहेत. याचाच अर्थ दररोज १६२ नव्या मतदारांची नोंद झाली आहे. मतदारसंख्येत ८.२५ टक्के वाढ झाली आहे”.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...