Friday, July 5, 2024
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : "…तर केंद्रातील एनडीएचे सरकार कधीही कोसळू शकते"; राहुल गांधींचा...

Rahul Gandhi : “…तर केंद्रातील एनडीएचे सरकार कधीही कोसळू शकते”; राहुल गांधींचा मोठा दावा

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

नुकतेच काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार (NDA Government) केंद्रात स्थापन झाले आहे. भाजपला बहुमत न मिळाल्याने मोदींसमोर एनडीएचे सरकार पाच वर्ष टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.मात्र, दुसरीकडे विरोधक केंद्रातील एनडीएचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा सातत्याने करत आहेत. अशातच आता काँग्रेसचे (Congress) खासदार राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सरकार कोसळण्याबाबत मोठे विधान केले आहे.

हे देखील वाचा : Nashik News : २५ कोटींचे नाट्यगृह बंद अवस्थेत

यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की,” भारताच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले आहेत.यंदाच्या निवडणुकीत (Election) भाजपला(BJP) बहुमत मिळालेले नाही.त्यामुळे त्यांच्या एका चुकीमुळे सरकार पडू शकते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात नाराजी आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमधील खासदार (MP) आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय आघाडी सरकारमधील खासदार भूमिका बदलू शकतात, सेही त्यांनी म्हटले. तसेच भाजपचे द्वेषपूर्ण राजकारण हे भारतीय जनतेने नाकारले आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

हे देखील वाचा : Manoj Jarange : “लक्ष्मण हाकेंचे उपोषण सरकार पुरस्कृत”; जरांगेंचा गंभीर आरोप

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “२०१४ आणि २०१९ या कार्यकाळात ज्याप्रकारे नरेंद्र मोदींनी काम केले ते काम आता करू शकत नाही. लोकसभा निकालात इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. तर भाजपच्या नेतृत्वातील एनडीएकडे २९३ जागा आहेत.ज्या पक्षाने मागील १० वर्ष अयोध्येचे सांगत घालवले त्यांना अयोध्येत हरवले आहे. भाजपा धर्माच्या नावावर राजकारण करून द्वेष पसरवत आहे. विरोधी पक्षाने जी चांगली कामगिरी केली त्यात भारत जोडो यात्रेचे मोठे योगदान आहे.नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.परंतू, मागील दोन लोकसभेप्रमाणे यंदा भाजपा स्वबळावर बहुमताचा आकडा पार करू शकली नाही.सरकार बनवण्यासाठी त्यांना एनडीएच्या घटक पक्षावर निर्भर राहावे लागले असेही राहुल गांधी यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या