Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशभारताच्या विनाशाचा मोहरा होऊ देऊ नका; राहुल गांधींचं Twitter च्या सीईओंना पत्र

भारताच्या विनाशाचा मोहरा होऊ देऊ नका; राहुल गांधींचं Twitter च्या सीईओंना पत्र

दिल्ली | Delhi

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांना पत्र लिहिले होते. या पत्रात राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातल्या जाणाऱ्या निर्बंधांवर भाष्य केले आहे. राहुल गांधी यांनी २७ डिसेंबर रोजी ट्विटरला पत्र लिहीले आहे.

- Advertisement -

भारतातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्यासाठी ट्विटर नकळत सामील होत आहे. एका सरकारी मोहिमेच्या प्लॅटफॉर्मवरील पोहोच दडपल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. ट्विटर अकाउंटवरील डेटाचे विश्लेषण तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्याशी तुलना या पत्रातून करण्यात आली होती.

२०२१ च्या पहिल्या सात महिन्यांत आपल्या अकाउंटशी सरासरी ४ लाख फॉलोअर्स जोडले गेले. पण गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ८ दिवसांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर ही वाढ अचानक अनेक महिने थांबली. याच काळात इतर राजकारण्यांच्या फॉलोअर्सची संख्या अबाधित राहिली, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी पराग अग्रवाल यांना लिहिले, ‘ट्विटर भारतातील हुकूमशाहीच्या वाढीस सक्रियपणे मदत करत नाही, याची खात्री करण्याची तुमची मोठी जबाबदारी आहे. “जगभरातील उदारमतवादी लोकशाही आणि हुकूमशाही यांच्यातील वैचारिक लढाई सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उदयास येत आहे. यामुळे ट्विटर सारख्या कंपन्यांचे नेतृत्व करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी येते,’ असं ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचे छायाचित्र ट्विट केल्याने त्यांचे ट्विटर अकाऊंट वादात सापडले होते. पीडितेच्या कुटुंबीयांचा फोटो ट्विट करून त्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप भाजपा सदस्यांनी केलेल्या तक्रारीत करण्यात आला. नंतर, कायद्याचं उल्लंघन झाल्याचं म्हणत राहुल गांधींचं अकाउंट एका आठवड्यासाठी लॉक करण्यात आलं होतं.

दरम्यान राहुल गांधी यांच्या आरोपांवर ट्विटरने प्रतिक्रिया देत उत्तर दिलं आहे. ट्विटरने यावर प्रतिक्रिया देताना ही संख्या अर्थपूर्ण आणि अचूक असल्याचं सांगितलं आहे. ट्विटरच्या प्रवक्त्याने फॉलोअर्सची संख्या हे समोर दिसणारं एक फिचर असून प्लॅटफॉर्मची हाताळणी आणि गडबड यासाठी चुकीला कोणतीही जागा नसल्याचं सांगितलं आहे.

आम्ही कोणत्याही प्रकारचा घोटाळा तसंच छेडछाड होऊ नये यासाठी धोरणात्मकपणे आणि मशीन लर्निंग टूल्सच्या सहाय्याने लढा देतो. चांगली सेवा आणि विश्वासार्ह खाती सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण आणि सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून फॉलोअर्सच्या संख्येत चढ-उतार होऊ शकतात, असंही ट्विटर प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या