दिल्ली l Delhi
राज्यसभेत वादग्रस्त कृषी विधेयक विरोधकांच्या गोंधळातच मंजूर करण्यात आले आहे. विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. पण कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी विधेयक सादर केले आणि त्यावर मतदान घेऊन मंजूर करण्यात आले. मात्र कॉंग्रसचे नेते राहुल गांधी यांनी या कृषी विधेयका वरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारवर निशाना साधला आहे.
- Advertisement -
राहुल गांधी यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, “मोदी सरकारच्या कृषि विरोधी काळ्या कायद्यांमुळे शेतकरी बाजार नष्ट होतील, मग एमएसपी कशी मिळणार?, एमएसपीची खात्री का नाही? मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवत आहे. पण देश हे कधीही यशस्वी होऊ देणार नाही.”